...तर मुंबईतला 2 किलोमीटरचा परिसर होऊ शकतो उद्‌ध्वस्त

...तर मुंबईतला 2 किलोमीटरचा परिसर होऊ शकतो उद्‌ध्वस्त

या भागात भाभा अणुसंशोधक केंद्र आणि त्यालगत देशाला इंधन पुरवठा करणाऱ्या एपीसीएल (HPCL) आणि बीपीसीएल (BPCL) या ऑईल रिफायनरीज आहेत.

  • Share this:

मुंबई, 08 आॅगस्ट :  मुंबईतील चेंबूर माहुलगाव परिसरातील बीपीसीएल रिफायनरी कंपनीच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत 21 जण जखमी झाले आहे. आज दुपारी ३ वाजता ही घटना घडली. स्फोटानंतर मोठा आवाज झाला आणि आगडोंब उसळला. कंपनीमधून मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ येत आहेत. कंपनीत स्फोट झाल्यानंतर माहुलगावला मोठा हादरा बसला. या परिसरातील घरांच्या खिडक्याच्या काचा फुटल्या आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आसपासच्या कंपन्यांना खाली करण्यात आल्या आहेत. मानवी वस्तीत अशा कंपनी असणे यावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले. एवढंच नाहीतर बीपीसीएलसह या भागात भाभा अणुसंशोधक केंद्र, एपीसीएल दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचं समोर आलंय.

बीपीसीएल आणि पूर्व भाग संवेदनशील

1995 मध्ये भारत पेट्रोलियम तेल कंपनीची रिफायनरी उभारण्यात आली. प्रतिवर्षी 12 मिलियन मेट्रिक टन तेलसाठा शुद्धीकरणाची क्षमता या कंपनीत आहे. या रिफायनरीला ISO 9001 मानांकन आहे.

मुंबईचा पूर्वेकडचा पट्टा अतिशय संवेदनशील समजला जातो. या भागात भाभा अणुसंशोधक केंद्र आणि त्यालगत देशाला इंधन पुरवठा करणाऱ्या एपीसीएल (HPCL) आणि बीपीसीएल (BPCL) या ऑईल रिफायनरीज आहेत. या ऑईल रिफायनरीजमध्ये एका वेळी 20 लाख किलो लिटर इतका पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि इतर इंधनाचा साठा असतो. 700 एकरवर पसरलेल्या या परिसरात 200 मोठे इंधन साठे आहेत. इथं स्फोट झाला तर तब्बल 2 किलोमीटरचा परिसर पूर्णपणे उद्‌ध्वस्त होईल, असं तज्ज्ञ सांगतात.

अतिरेक्यांचं साॅफ्ट टार्गेट

या रिफायनरीज आर्थिकदृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या असल्यानं अतिरेक्यांनी आता यांच्याकडे लक्ष वळवलंय. मुंबईतल्या या दोन रिफायनरीज उद्धवस्त झाल्या तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या सर्व राज्याचा इंधन पुरवठा ठप्प होऊ शकतो. यामुळे सरकारचं शेकडो कोटींचं नुकसान होईल. गुप्तचर विभागाने याबद्दल वारंवार इशारा दिलाय.  इशार्‍यानंतर या ऑईल रिफायनरीजची सुरक्षा वाढवण्यात आलीय. पण तरीही त्यात काही त्रुटी आहेत.

ऑईल रिफायनरीज किती सुरक्षित ?

2012 मध्ये गुप्तचर विभागाच्या इशार्‍यानंतर रिफायनरीजजवळच्या 57 निवासी इमारती रिकाम्या करण्यात आल्या. तसंच BARC ची सुरक्षा CISF आणि DAE या दोन सुरक्षा यंत्रणांच्या हाती असल्यानं समन्वयाचा अभाव आढळून आलं.  जुलै 2012 मध्ये करण्यात आलेल्या मॉक ड्रीलमध्ये BARCजवळच्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर आणि टाटा पॉवर प्लान्टमध्ये अतिरेकी किती सहजपणे घुसू शकतात, हे उघड झालंय.

संबंधीत बातम्या

 LIVE : बीपीसीएल स्फोटात 21 जण जखमी

बीपीसीएल रिफायनरीत आगडोंब, दुर्घटनेचा पहिला VIDEO

बीपीसीएल रिफायनरीत स्फोट,दुर्घटनेचे पहिले PHOTOS

First published: August 8, 2018, 5:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading