• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • मुंबईत अपहरण नाट्याचा थरार; प्रेयसीच्या मुलाचं अपहरण करणारा 24 तासात गजाआड

मुंबईत अपहरण नाट्याचा थरार; प्रेयसीच्या मुलाचं अपहरण करणारा 24 तासात गजाआड

पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपीच्या तावडीतून मुलाची सुटका केली असून त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 ऑक्टोबर: दादर पूर्व येथील नायगाव परिसरातून अपहरण (kidnapping in Dadar) झालेल्या 8 वर्षीय मुलाचा शोध घेण्यात भोईवाडा पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपीच्या तावडीतून मुलाची सुटका केली असून त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या प्रियकराला अटक (Boyfriend arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास भोईवाडा पोलीस करत आहेत. स्वीटी कीर्तीकुडे असं फिर्यादी महिलेचं नाव असून त्या नायगावच्या गोविंदराव कुडे मार्गावरील फुटपाथावर राहतात. तर विजय विक्रम अहिरे असं अटक केलल्या आरोपीचं नाव आहे. शुक्रवारी रात्री कीर्तीकुडे यांचा आठ वर्षीय मुलगा खेळायला गेला होता. खेळायला जाऊन बराच वेळ झाली तरी मुलगा परतला नाही, त्यामुळे कीर्तीकुडे यांनी आपल्या मुलाचा सर्वत्र शोध घेतला. सर्व ठिकाणी शोधाशोध करूनही मुलगा सापडला नाही. त्यामुळे किर्तीकुडे यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात जाऊन मुलाच्या अपहरणाची फिर्याद दाखल केली. बहिणीच्या अनैतिक संबंधातून निरागस भावाची हत्या; विचित्र घटनेनं नागपूर हादरलं! फिर्यादीचा प्रियकर विजय यानेच मुलाचं अपहरण केल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी त्वरित मुलाच्या शोधासाठी तीन पोलीस पथकं तयार केली. तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना फासशी माहिती मिळाली नाही. यानंतर पोलिसांनी आरोपीचे नातेवाईक आणि मित्रांची माहिती मिळवून त्यांच्याकडे चौकशी केली. संबंधित माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यातील हडपसर, उस्मानाबाद येथील इटगाव येथे शोध घेण्यासाठी दोन पथकं पाठवण्यात आली. तर अन्य एका पोलीस पथकाने मुंबईतील विविध ठिकाणी आरोपीचा शोध घेतला. यावेळी पोलिसांनी शिवडी येथील पारधीवाडा परिसरातून अपहरण झालेल्या मुलासह आरोपीला अटक केली आहे. यानंतर पोलिसांनी मुलाला आईच्या स्वाधीन केलं आहे. संबंधित मुलगा हा फिर्यादी महिलेच्या पहिल्या नवऱ्याचा आहे. तर आरोपी विजय हा मागील दीड वर्षांपासून फिर्यादी महिलेसोबत राहत होता. दरम्यान आरोपी विजयचा फिर्यादी महिलेसोबत किरकोळ कारणातून वाद झाला होता. या वादाचा सूड उगवण्यासाठीच त्यानं फिर्यादीच्या आठ वर्षीय मुलाचं अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: