शरीरसंबंधाला नकार दिला म्हणून प्रियकरानेच केला प्रेयसीवर ब्लेडने वार

18 वर्षांची पीडित आरती मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाची लढाई लढते आहे. तिच्यावर ब्लेडनं वार करण्यात आले आहेत. तिच्याच परिसरात राहणाऱ्या 20 वर्षांच्या अजमल शाह तिचा प्रियकर होता

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2017 07:27 PM IST

शरीरसंबंधाला नकार दिला म्हणून प्रियकरानेच केला  प्रेयसीवर ब्लेडने वार

28 नोव्हेंबर: शरीर संबंधांना नकार दिला म्हणून एका प्रियकरानेच आपल्या प्रेयसीवर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. दरम्यान जखमी मुलीला केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

18 वर्षांची पीडित आरती मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाची लढाई लढते आहे. तिच्यावर ब्लेडनं वार करण्यात आले आहेत. तिच्याच परिसरात राहणाऱ्या 20 वर्षांच्या अजमल शाह तिचा प्रियकर होता. शरीर संबंधांना नकार दिला म्हणून त्याने तिच्यावर काल हा हल्ला केला. दादरच्या एका लॉजमध्ये हा प्रकार घडलाय. काल नेहमीप्रमाणे आरती कॉलेजला गेली होती. पण ती घरी परत न येता हॉस्पिटलमध्येच पोहोचली. कालपासून ती शुद्धीवर आलेली नाही. पण अजूनही मध्येच कधीतरी तिला जाग येते. अजमल तिला त्रास देत होता, अशी तक्रार आरतीनं घटनेच्या 2 दिवस आधीच तिच्या बहिणीकडे केली होती. त्यामुळं अशी तक्रार करुनही ती अजमलसोबत लॉजवर क गेली हा कुटूंबीयांसमोरचा मोठा प्रश्न आहे.

आता आरतीप्रकरणी पोलीस कय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 07:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...