दोन वर्षांपूर्वी सुमेध जाधव आणि पीडित तरुणी एकाच ठिकाणी कामाला होते. तिथेच सुमेधला तरुणीवर प्रेम झालं आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. मात्र, सुमेधला दारू पिण्याची सवय होती, यामुळे तरुणीनं सुमेधला नकार दिला. मात्र, त्यानंतरही सुमेधनं तरुणीचा पाठलाग सोडला नाही. सुमेधच्या त्रासाला कंटाळून तरुणीच्या घरच्यांनी निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. ज्यानंतर काही दिवस सुमेध शांत होता. मात्र, पुन्हा त्यानं तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली. शुक्रवारी तरुणी जेव्हा खार स्टेशनवर आली तेव्हा सुमेध जाधवनं आधी स्वतः ट्रेन खाली उडी मारण्याचं नाटक केलं आणि नंतर तरुणीला चालत्या ट्रेनखाली ढकलण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं तरुणी बचावली, मात्र तिच्या डोक्यावर बारा टाके पडले. यानंतर लगचेच सुमेधनं तिथून पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आणि अखेर सुमेधला बेड्या ठोकल्या आहेत.लग्नाला नकार दिल्यानं तरुणानं एकतर्फी प्रेमातून तरुणीला धावत्या ट्रेनखाली ढकललं. खार स्टेशनवरचा हा प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. pic.twitter.com/zQKNq1Ffxr
— News18Lokmat (@News18lokmat) February 21, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv, Love story, Train accident