भाजप नगरसेवकांचा मुंबई पालिका आयुक्तांनी घेतला धसका? सुरक्षेसाठी बाउन्सर तैनात

भाजप नगरसेवकांचा मुंबई पालिका आयुक्तांनी घेतला धसका? सुरक्षेसाठी बाउन्सर तैनात

पालिकेत खासगी सुरक्षा रक्षक तैनात केल्याची ही पहिलीच घटना आहे.

  • Share this:

मुंबई, 11 ऑगस्ट : मुंबई पालिकेच्या सरकारी सुरक्षा रक्षकांव्यतिरिक्त आता खासगी बाउन्सरदेखील सरकारी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहे. सांगितले जात आहे की सुशांत सिंह प्रकरणात बिहारमधून आलेले IPS अधिकाऱ्यांना भाजपने क्वारंटाइन केल्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या कार्यालयाबाहेर येऊ आंदोलन केलं.

या आंदोलनात भाजपाच्या नगरसेवाकांनी आयुक्यांना भेटण्यासाठी गोंधळ घातला. त्यांच्या कार्यालयातील दरवाज्यावर पोस्टर लावले होते. भाजपा नगरसेवकांच्या आंदोलनादरन्यान ते बीएमसी आयुक्तांच्या कर्मचाऱ्यांवर ओरडले आणि त्यांना शिवागाळ केली, असा आरोपी करीत पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ट्विट केलं होतं. भाजपच्या या आंदोलनानंतर आता पालिका एकूण 18 खासगी बाउन्सर ड्यूटीवर ठेवण्यात आले आहेत.

हे वाचा-भाजपचा मोठा नेता शरद पवारांच्या भेटीला, सुप्रिया सुळेंनी फोटो केला शेअर

हे खासगी बाउन्सर इगल नावाच्या कंपनीचे आहेत. पालिकेत खासगी सुरक्षा रक्षक तैनात केल्याची ही पहिलीच घटना आहे. तर भाजपकडून यावर टीका केली जात असून खासगी बाउन्सरची गरज का पडली आणि त्यांचा पगार कोण देत आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांसह पालिकेवरही विरोधकांकडून टीका केली जात आहे. मुंबई पोलीस सुशांत प्रकरणात योग्य तपास करीत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 11, 2020, 8:59 PM IST
Tags: #MumbaiBMC

ताज्या बातम्या