मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई विमानतळावर पेट्रोलनं भरलेली बाटली सापडणं दहशतवादी कृत्य? पोलिसांकडून खुलासा

मुंबई विमानतळावर पेट्रोलनं भरलेली बाटली सापडणं दहशतवादी कृत्य? पोलिसांकडून खुलासा

काल सायंकाळी मुंबई विमानतळावर एक पेट्रोलनं भरलेली बाटली फेकण्यात आली आहे. (File Photo)

काल सायंकाळी मुंबई विमानतळावर एक पेट्रोलनं भरलेली बाटली फेकण्यात आली आहे. (File Photo)

Crime in Mumbai: मुंबई विमानतळावर एक पेट्रोलनं भरलेली बाटली फेकण्यात आली आहे. यामुळे परिसरात दहशतीच वातावरण निर्माण झालं आहे.

मुंबई, 13 ऑगस्ट: काही दिवसांपूर्वी मुंबईतील दादर रेल्वे स्टेशसह अन्य चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिल्यानंतर मुंबईत दहशतीच वातावरण तयार झालं होतं. ही घटना ताजी असतानाच, आता दहशतवादी कृत्याची आणखी एक घटना समोर आली आहे. काल सायंकाळी मुंबई विमानतळावर एक पेट्रोलनं भरलेली बाटली फेकण्यात आली आहे. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं काही अज्ञातांनी हे कृत्य केलं असावं, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. पण याबाबत आता मुंबई पोलिसांनी अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे.

संबंधित पेट्रोलनं भरलेली बाटली धावपट्टी जवळ नाही तर विमानतळाच्या कम्पाउंड जवळ सापडली असल्याचं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलं आहे. संबंधित बाटलीत केवळ 50 ML पेट्रोल असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेमुळं धावपट्टीला किंवा विमान सेवेला कोणताही धोका नाही. विमानतळ सरंक्षण भिंतीला लागून असलेल्या झोपडपट्ट्यांमधून ही बाटली टाकण्यात आली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्या अनुषंगानं मुंबई पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा- मुंबई पोलिसांना रात्रभर कामाला लावणाऱ्या तरुणांना अटक; बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमागचं सत्य उघड

50 मिली पेट्रोलनं भरलेली बाटली फेकणं निव्वळ खोडसाळपणा आहे. विमानतळाच्या सरंक्षण भिंती शेजारी काही गॅरेज आहेत. तसेच कोणी तरी गाडीत पेट्रोल भरुन उरलेलं पेट्रोल तिथेच फेकून दिलं असावं असंही पोलिसांनी सांगितलं आहे. पण या घटनेची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

नेमकं काय घडलं?

काल सायंकाळी मुंबई विमानतळनजीक असणाऱ्या झोपडपट्टीच्या भागातून अज्ञातांनी पेट्रोलनं भरलेली बाटली विमानतळाच्या संरक्षण भींतीजवळ फेकली होती.  CISF च्या जवानांना ही बाटली सापडली आहे. CISF च्या जवानांनी या कृत्याची गांभीर्यानं दखल घेतली असून याप्रकरणी मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी काही अज्ञातांविरोधात कलम 336 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पण यामागे कोणताही घातपात करण्याचा हेतू नसावा, हे कोणीतरी खोडसाळ कृत्य केलं असावा, असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलं आहे.

First published:

Tags: Crime news, Mumbai