पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती करताना 7 कर्मचाऱ्यांना बसला विजेचा धक्का, दोघांचा जागीच मृत्यू

पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती करताना 7 कर्मचाऱ्यांना बसला विजेचा धक्का, दोघांचा जागीच मृत्यू

मुंबईतील कुर्ला परिसरातील सुमननगरजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. या भागात पाण्याची पाईपलाईन फुटली होती.

  • Share this:

मनोज कुळकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 19 ऑक्टोबर : मुंबईत पाईपलाईनच काम सुरू असताना वीजेचा धक्का लागून पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 कर्मचारी जखमी झाले आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईतील कुर्ला परिसरातील सुमननगरजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. या भागात पाण्याची पाईपलाईन फुटली होती. या पाईपलाईनच्या दुरुस्तीच काम सुरू होते. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास काम करण्यासाठी कर्मचारी पोहोचले होते. तेव्हा अचानक 7 कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसला. यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर पाच जण हे यातून थोडक्यात बचावले आहे.

ढगफुटी झाल्याने फोडले दोन बंधारे, पुण्यातल्या बाजारपेठेतला भीषण VIDEO

या दुर्घटनेत गणेश दत्तू (वय 45) आणि अमोल काळे (40) या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जर इतर पाच जण जखमी झाले आहे.

नाना पुकळे (41), महेश जाधव (40), राकेश जाधव(39) अनिल चव्हाण (43), नरेश अधांगळे(40) अशी जखमींची नावं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑन फिल्ड, जागेवरच नुकसानग्रस्तांना 11 धनादेश वाटप!

जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ही घटना नेमकी कशी आणि का घडली याचा तपास करण्यात येत आहे.

Published by: sachin Salve
First published: October 19, 2020, 2:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या