ठाणे, 20 जुलै: सध्या ठाण्याहून (Thane) बोरिवलीला (Borivali) येण्यासाठी किंवा बोरिवलीवरुन ठाण्याला जाण्यासाठी जवळपास 60 मिनिटं लागतात. मात्र हा प्रवासाचा वेळ लवकरच कमी होणार आहे. ठाण्याहून बोरिवली भूमिगत मार्ग (Underground tunnel) झाल्यानंतर ठाण्याहून बोरिवलीला येण्यासाठी ठाणेकरांना केवळ 15 मिनिटं लागतील. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shine) प्रयत्नशील आहेत. या मार्गासाठी शासकीय औपचारिकता पूर्ण केल्या जात असल्याची माहिती मिळतेय.
असं म्हटलं जात आहे की, हा भूमिगत मार्ग पूर्ण झाल्यानंतर ठाणेकरांसह मुंबईकरांना देखील याचा फायदा होणार आहे. सध्या मुंबईहून ठाणे आणि बोरिवलीवरुन ठाण्यापर्यंत प्रवासासाठी जवळपास एक तासाचा अवधी लागतो.
एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि बोरिवलीला जोडणारा एक भूमिगत रस्ता बनवण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 11, 235.43 कोटी रुपये इतकी आहे. ठाणे-बोरिवलीला जोडणारा दुहेरी बोगद्यामुळे नागरिकांचा प्रवास वेगानं होईल. या मार्गामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीचा कोंडीचा प्रश्नही मार्गी लागेल.
''कोरोनाशी लढण्यासाठी मुलांची Immunity मजबूत, शाळा सुरु करा''
या मार्गावर संजय गांधी नॅशनल पार्कच्या (Sanjay gandhi national park) खालून 10.25 किलोमीटर लांबीचे दोन ते तीन लेनच्या बोगद्यासह 11.8 किलोमीटर लांबीचा कनेक्टिंग रोड होईल. जो ठाण्यात टिकुजी-नी-वाडी हून बोरिवलीमध्ये पश्चिम एक्स्प्रेसवे पर्यंत जाईल.
ठाणे-बोरिवली बोगद्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 16.54 हेक्टर खासगी जमीन आणि 40.46 हेक्टर जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे. मार्च 2022 मध्ये सुरू होणाऱ्या या प्रकल्पाला साडेपाच वर्षे लागतील.
विनोदवीराची प्रेमकथा डोळ्यात पाणी आणेल; कुशल बद्रिकेला प्रेयसी द्यायची 50 रुपये
दर 300 मीटर अंतरावर क्रॉस बोगदे असतील. या रचनेमुळे वाहनांना ताशी 80 किलोमीटर वेगाने प्रवास करता येईल. यामुळे 60 मिनिटांचा प्रवासाचा कालावधी 15 ते 20 मिनिटांपर्यंत कमी होईल. ज्यामुळे वेळेची बचत होईल आणि इंधनाचा वापर 10.5 लाख मेट्रिक टन इतका कमी होईल. या बोगद्यात ड्रेनेज सिस्टम, स्मोक डिटेक्टर आणि जेट फॅनसह समान वैशिष्ट्ये लागू केली जातील. अरुंद बोगद्याच्या आतील हवा स्वच्छ आणि ताजी राहावी यासाठी विशेष उपाय योजना केल्या जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Thane