मुंबईत शॉपिंग मॉलला लागलेली आग आटोक्यात, पण निर्माण झाले गंभीर प्रश्न?

मुंबईत शॉपिंग मॉलला लागलेली आग आटोक्यात, पण निर्माण झाले गंभीर प्रश्न?

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन तब्बल 5 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : मुंबईतील बोरीवली परिसरात एका शॉपिंग मॉलला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पण शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे.

बोरीवली परिसरात पहाटे 3 वाजेच्या सुमारास इंदिराप्रस्थ शॉपिंग सेंटरमध्ये आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण करण संपूर्ण शॉपिंग सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाचा भीषण अपघातात मृत्यू, Ducati चा चक्काचूर!

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन तब्बल 5 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे. रोबोटच्या साह्याने जलद गतीने भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. याकरता जवळपास 14 फायर इंजीन, वॉटर टॅंकर आणि आग विझविण्याकरता विविध साहित्यांचा वापर केला गेला. लेव्हल 4 ची आग असल्याने सर्वच वरीष्ठ अधिकारी या घटनास्थळी उपस्थित होते.

लॉकडाऊनचा ट्रेण्ड कधीपर्यंत संपेल? तज्ञांसोबतच्या चर्चेनंतर शरद पवारांचा अंदाज

दरम्यान,  शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. कारण, जर फायर फायटिंग सिस्टिम नसेल आणि बेस मेंटमध्ये दुकाने असतील तर त्याला जबाबदार अधिकाऱ्यांना हे दिसलं नव्हतं का? दिवसा ही आग लागली आणि आणि बेसमेंटमध्ये लोकं असती तर मोठी हानी झाली असती.

न्यूज 18 लोकमतने उपस्थित केलेले प्रश्न?

प्रश्न 1 : बोरिवली सारख्या महत्वाच्या आणि गजबजलेल्या रेल्वे स्थानकाला अगदी खेटून हा मॉल कसा काय उभारला गेला?

प्रश्न 2 : बेसमेंटमध्ये दुकाने नसावीत असा नियम असताना बेसमेंटमध्ये दुकाने का सुरू होती?

प्रश्न 3 : मॉलमध्ये किंवा इमारतीत फायर फायटिंग सिस्टिम कार्यांन्वीत आहे का? याचे बीएमसी आणि अग्निशमन दलाकडून ॲाडिट करण्यात येते, या मॉलचे ॲाडिट झाले होते का?

प्रश्न 4 : बेसमेंटमध्ये अनधिकृत दुकानांवर कारवाई का केली गेली नव्हती?

प्रश्न 5 : बेसमेंट मध्ये आग लागल्याने नागरीकांचा आणि अग्नीशमन दलातील जवानांचा अनेकदा जीव गेलाय तरीही बेसमेंट मध्ये दुकाने सुरुच कशी होती?

प्रश्न 6 : मुंबई महानगरपालिका संबंधीत अधिका-यांवर कारवाई करणार का?

Published by: sachin Salve
First published: July 11, 2020, 10:20 AM IST
Tags: borivali

ताज्या बातम्या