Home /News /mumbai /

वांग्याची भाजी बनवल्याने केलेली आईची हत्या; जन्मठेपेची शिक्षा रद्द करत मुंबई उच्च न्यायालयाचा आरोपीला दिलासा

वांग्याची भाजी बनवल्याने केलेली आईची हत्या; जन्मठेपेची शिक्षा रद्द करत मुंबई उच्च न्यायालयाचा आरोपीला दिलासा

हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर आरोपी मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्यातील या व्यक्तीची शिक्षा कमी केली आहे.

    मुंबई 07 जुलै : एका व्यक्तीने आपल्या आईची हत्या यासाठी केली, कारण तिने स्वयंपाकघरात माशाऐवजी वांग्याची भाजी बनवली होती (Man Killed Mother for Cooking Brinjal). हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर आरोपी मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्यातील या व्यक्तीची शिक्षा कमी केली आहे. फोर व्हिलरमध्ये लाखो रुपये, पोलिसांना सुगावा, बुलडाण्यात सिनेस्टाईल घडामोडी; अखेर चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या नरेश पवार आणि त्याची आई एकाबाई ठाणे जिल्ह्यातील निलजेपाडा येथे वीटभट्टीवर काम करत होते आणि जवळच एका झोपडीत राहत होते. 19 मार्च 2011 रोजी बरेच कामगार होळी साजरी करण्यासाठी आपापल्या गावी गेले होते. नरेश पवार आणि त्याची आई त्यांच्या झोपडीत होते. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नरेश याचं आई एकाबाई यांच्याशी वांग्याची भाजी बनवल्यावरून भांडण झालं. नरेश पवारने आईला विचारलं की तू मासे का बनवले नाही. त्याच्या जागी बटाट्याची आणि वांग्याची भाजी केली आणि ती नीट शिजलीही नाही, असं तो म्हणाला. यानंतर संतापलेल्या नरेशने लोखंडी रॉड उचलून आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. शेजाऱ्यांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याने आईचा खून केला होता. एकाबाईला मृत घोषित केल्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आणि खटल्यादरम्यान नरेशने तो निर्दोष असल्याचं सांगितलं. फिर्यादी पक्षाने 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह 7 साक्षीदार हजर केले. सत्र न्यायालयाने पवार याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अभ्यास केला नाही म्हणून पालकांनी केली बेदम मारहाण, 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू कल्याण न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध नरेश याने केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती पी.बी. वराळे आणि न्यायमूर्ती एस.डी.कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी नरेशची बाजू मांडताना अधिवक्ता सुशील इनामदार म्हणाले की, आरोपी संतापला होता आणि रागाच्या भरात त्याने लोखंडी रॉडने आईची हत्या केली केली. .त्याच्या आईच्या पाठीवर २-३ वार केले गेले, ज्यात महिलेचा तत्काळ मृत्यू झाला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Mumbai News, Murder news

    पुढील बातम्या