News18 Lokmat

लोकांच्या खड्ड्यात जीव जातोय,तुम्हाला फायर ब्रिगेडची पडलीये,कोर्टाने बीएमसीला फटकारलं

मलबार हिलमधील रहिवाश्यांचा विरोध डावलून प्रियदर्शनी पार्कमध्ये फायर ब्रिगेड स्थानक उभारण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या पालिका प्रशासनाला हायकोर्टाने चांगलंच धारेवर धरलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2017 10:30 PM IST

लोकांच्या खड्ड्यात जीव जातोय,तुम्हाला फायर ब्रिगेडची पडलीये,कोर्टाने बीएमसीला फटकारलं

30 आॅक्टोबर : मलबार हिलमधील रहिवाश्यांचा विरोध डावलून प्रियदर्शनी पार्कमध्ये फायर ब्रिगेड स्थानक उभारण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या पालिका प्रशासनाला हायकोर्टाने चांगलंच धारेवर धरलंय. मुंबईच्या रस्त्यांवर खड्यांचं साम्राज्य वाढतंय, रस्ते अपघातात लोकांचे जीव जातायत आणि तुम्हाला फायर ब्रिगेडची पडलीये आधी इतर समस्यांकडे गांभीर्यानं पाहा अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं महानगरपालिकेला खडसावलंय.

पालिकेच्यावतीनं इथं उभारण्यात आलेलं तात्पुरतं अग्निशमन केंद्र ताबडतोब हटवण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहे. १९ जून २०१७ ला हे केंद्र हटवण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले असताना असतानाही ते अजुनही पूर्ण का केले नाहीत? असा सवाल करत हायकोर्टाने मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तात्पुरतं अग्निशमन केंद्र हटवण्याचे आदेश दिलेत.

बुधवारी मलबार हिल रहिवाशी संघटनेच्यावतीनं दाखल याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे. फायर ब्रिगेडमुळे जॉगिंला प्रियदर्शनी पार्कमध्ये येणाऱ्या रहिवाश्यांना त्रास होत असल्याने तिथल्या रहिवाशी संघटनेनं याविरोधात हायकोर्टात धाव घेतलीय.

प्रियदर्शनी पार्कचा भूखंड हा फायर ब्रिगेडसाठी राखीव आहे असा दावा करत पालिकेनं तिथ उभारण्यात आलेली जॉगिंग ट्रॅक हा बेकायदेशीर असल्याचा आरोप हायकोर्टात केलाय. तसंच १४ जून २०१७ ला तात्पुरतं अग्निशमन केंद्र उभारल्यापासून तिथं २९ कॉल्स घेण्यात आलेत. नियमानुसार ५० हजार लोकसंख्या असलेल्या विभागात स्वतंत्र अग्निशमन केंद्र असणं आवश्यक आहे. याआधी मलबार हिल परिसरात नाना चौकातून अग्निशमन सेवा पुरवली जायची. मात्र ट्रॅफिकमुळे घटनास्थळी तात्काळ पोहचणं कठीण जायचं. त्यामुळे प्रियदर्शनी पार्क इथं एक छोटेखानी अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला अशी भूमिका पालिकेनं हायकोर्टात मांडलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2017 10:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...