05 मे : ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील नवीन बांधकामांना परवानगी न देण्याचे मुंबई हायकोर्टाने ठाणे महापालिकेला आदेश दिले आहेत.
घोडबंदर भागात पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध नसताना नव्या बांधकामांना पाणी देणं योग्य होणार नाही असं मत हायकोर्टाने नोंदवलं. त्यामुळे ९ जूनपर्यंत नव्या बांधकामांना सीसी आणि बांधकाम पूर्ण झालेल्या बांधकामांना ओसी देण्यात येऊ नये असा हायकोर्टाने आदेश दिला आहे.
बांधकामं थांबू शकतात पण माणसं पाणी पिण्यावाचून थांबू शकत नाही असं मतंही कोर्टाने व्यक्त केलं आहे. घोडबंदर परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर असताना त्याविषयी कोणतंही नियोजन न करता ठाणे महापालिका सरसकट नव्या बांधकामांना परवानगी देत असल्याची जनहित याचिका मंगेश शेलार यांनी केली होती त्यावर हायकोर्टाने हा अंतरिम आदेश दिला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा