'मुंबई मेट्रो 3'साठी रस्ता मोकळा, आरे विरोधातल्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या

मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनी येथील वृक्षतोड करण्याच्या विरोधात पर्यावरण प्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2019 01:00 PM IST

'मुंबई मेट्रो 3'साठी रस्ता मोकळा, आरे विरोधातल्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या

मुंबई, 04 ऑक्टोबर : आरे विरोधातल्या मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई रेल मेट्रो कॉर्पोरेशनला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनी येथील वृक्षतोड करण्याच्या विरोधात पर्यावरण प्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या सर्व याचिका उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आल्या आहेत.

मुंबई वृक्ष प्राधिकरणाने कारशेडसाठी आरेमधील 2700 झाडे तोडण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला होता, ज्यांनंतर या निर्णयावर आक्षेप घेत पर्यावरण प्रेमींनी  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. याबात उच्च न्यायालयाकडून निर्णय राखीव ठेवण्यात आला होता. अखेर 4 ऑक्टोबरला न्यायालयाकडून या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मेट्रोचं कारशेड होणार असल्याची माहिती आहे.

इतर बातम्या - काँग्रेसची आणखी एक उमेदवार यादी जाहीर, कोकणातील उमेदवार बदलला

दरम्यान, 'आरे हे जंगल नाही' असं म्हणत मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठाकडून निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

झाडे तोडण्याच्या निर्णयाविरोधात झोरू भथेना यांनी याचिका दाखल केली होती. यात शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्य सरकार आणि मेट्रोला दिलासा दिला. त्यामुळे आता आरेमध्ये मेट्रोची कारशेड आरेतच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading...

इतर बातम्या - अपघातात भाजप नगरसेविकेचा मृत्यू, फुटपाथवर उभ्या असताना कारने उडवलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 12:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...