Home /News /mumbai /

तीन मुलांच्या गर्भपातासाठी High Courtचं दार ठोठवणाऱ्या महिलेला दिलासा

तीन मुलांच्या गर्भपातासाठी High Courtचं दार ठोठवणाऱ्या महिलेला दिलासा

एक दाम्पत्य आहे ज्याला 8 वर्षांचा मुलगा आहे. या दाम्पत्यानं गर्भपातास परवानगी मिळावी यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

    मुंबई, 22 मे: तीन मुलांच्या गर्भपातास (Triple pregnancy) एका महिलेला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. गर्भधारणा सुरु राहिल्यास तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे म्हणून ही वस्तूस्थिती लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay high court)हा निर्णय घेतला आहे. एक दाम्पत्य आहे ज्याला 8 वर्षांचा मुलगा आहे. या दाम्पत्यानं गर्भपातास परवानगी मिळावी यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. ज्यानंतर न्यायालयानं जेजे रुग्णालयाचे डीन, विभाग प्रमुख (स्त्री रोग), प्राध्यापक आणि बालरोग/ हृदय सर्जन विभागाचे प्रमुख, रेडिओलॉजी (Radiology) विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, मानसोपचार विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि न्यूरोलॉजिकल विभाग प्रमुख आणि इतर अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करत एक वैद्यकीय समिती स्थापित करण्याचे आदेश दिले होते. हेही वाचा- पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात वाढतोय Mucormycosisचा धोका न्यायालयानं वैद्यकीय समितीला महिलेची तपासणी करण्यास आणि तिची संपूर्ण गर्भधारणा समाप्ती संदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. महिलेच्या गर्भधारणेनं 24 आठवड्यांचा कालावधी ओलांडला होता. त्यामुळे या दाम्पत्याला न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली. 24 आठवड्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानं गर्भपातासाठी न्यायालयाची परवानगी अनिवार्य होती. वैद्यकीय समितीनं पाठवलेल्या अहवालात तीन मुलांच्या गर्भपातास परवानगी देण्याचा सल्ला देण्यात आला. वैद्यकीय समितीनं म्हटलं की... या महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर समितीनं निष्कर्ष काढला. यात समितीनं म्हटलं की, उच्च आजारपण आणि मृत्यू तसंच याव्यतिरिक्त शारीरिक अपंगत्व येण्याची शक्यता आहे. समितीच्या मानसिक तज्ज्ञांनी महिलेच्या कुटुंबाची चर्चा केल्यानंतर गर्भपात करण्याची शिफारस केली. या गर्भधारणेमुळे महिलेच्या मानिसक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता होती. हेही वाचा- हुंड्यात बुलेट मागणं नवरदेवाला पडलं चांगलंच महागात, नवरा थेट तुरुंगात न्यायालयानं म्हटलं की, 41 वर्षीय महिला आणि तिचं कुटुंब गरीब आहे. पती ड्रायव्हर असून दरमहिना 12 हजार ते 15 हजार रुपये तो कमावतो. या महिलेनं यापूर्वी मानसिक उपचार घेतले असून 2020 च्या ऑक्टोबरमध्ये तिला काही औषध देखील देण्यात आली होती.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Pregnancy, The Bombay High Court

    पुढील बातम्या