मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

29 दिवसांनंतर रिया चक्रवर्ती तुरुंगातून येणार बाहेर, या अटींवर जामीन मंजूर

29 दिवसांनंतर रिया चक्रवर्ती तुरुंगातून येणार बाहेर, या अटींवर जामीन मंजूर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये आज सर्वात मोठी घडामोड घडली आहे. याप्रकरणी तुरुंगात असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला जवळपास महिनाभराने जामिन मंजूर करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Manoj Khandekar

मुंबई, 07 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये आज सर्वात मोठी घडामोड घडली आहे. याप्रकरणी तुरुंगात असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) जवळपास महिनाभराने जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. याप्रकरणी अटकेत असणाऱ्या सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांचा जामीन अर्ज देखील खंडपीठाने मंजूर केला आहे. तर शौविकबरोबर अब्दुल बसीथ परिहारचा जामीन अर्थ फेटाळण्यात आला आहे. NDPS कायद्याच्या विविध तरतुदींनुसार त्यांच्याविरोधात एनसीबीने खटला दाखल केला होता.

मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा दिला आहे. 29 दिवसांनी उच्च न्यायालयाने अभिनेत्रीचा जामीन मंजूर केला आहे. मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश एस. व्ही. कोतवाल यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. रिया चक्रवर्तीला 8 सप्टेंबर रोजी जुन्या WhatsApp चॅटच्या आधारावर अटक करण्यात आली होती. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या 5 पैकी 3 आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.

(हे वाचा-'बिहार मैं आपका स्वागत है...', Most Awaited 'मिर्झापूर-2'चा ट्रेलर लाँच)

जामीन मंजूर करताना रियाला काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 1 लाख रुपयाचा जामीन बाँड भरावा लागणार आहे. तसंच तिला देशाबाहेर जाता येऊ नये याकरता तिला तपास यंत्रणेकडे तिचा पासपोर्ट देखील जमा करावा लागणार आहे. कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय तिला देशाबाहेर जाता येणार नाही. रियाला मुंबईबाहेर जाण्याची परवानगी नाही आहे त्याचप्रमाणे जेव्हा एनसीबीकडून तिला चौकशीसाठी बोलावले जाईल त्यावेळी तिला हजर रहावे लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार रियाला तिच्या सुटकेनंतर दहा दिवस जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावणे गरजेचे आहे.

(हे वाचा-Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: नवरात्रीच्या एपिसोडमध्ये दयाबेन करणार कमबॅक?)

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर करणाऱ्या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने आम्हाला आनंद झाला आहे. सत्य आणि न्यायाचा हा विजय आहे आणि शेवटी न्यायाधीश सारंग व्ही कोतवाल यांनी वस्तुस्थिती आणि कायद्यावर आधारित निर्णय दिला. रियाला अटक करणे आणि ताब्यात घेणे पूर्णपणे अनधिकृत आणि कायद्याबाहेरचे होते. रियाबाबत सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन मध्यवर्ती एजन्सींने केलेले 'Witch Hunt' आणि धमक्या थांबायलाच हवे होते. आम्ही सत्यासाठी कटिबद्ध आहोत. सत्यमेव जयते.'

First published:

Tags: Rhea chakraborty