मोठी बातमी! मुंबईतील मोहरमच्या ताझिया मिरवणुकीला हायकोर्टाची सशर्त परवानगी

मोठी बातमी! मुंबईतील मोहरमच्या ताझिया मिरवणुकीला हायकोर्टाची सशर्त परवानगी

भेंडी बाजार ते माझगाव कबरीस्तानपर्यंत ट्रकमधून ही मिरवणूक निघणार आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट: मुंबई हायकोर्टानं रविवारी निघणाऱ्या मोहरमच्या ताझिया मिरवणुकीसाठी शुक्रवारी सशर्त परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांच काटेकोरपणे पालन करण्याचेही निर्देश कोर्टानं दिले आहेत. शेवटचे 100 मीटर केवळ 5 भाविकांना ताझिया घेऊन पायी जाण्याची परवानगी असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे. भेंडी बाजार ते माझगाव कबरीस्तानपर्यंत ट्रकमधून ही मिरवणूक निघणार आहे.

हेही वाचा...बाप्पाच्या भाविकांना आता घरबसल्या घेता येणार मुंबईच्या सिद्धीविनायकाचं दर्शन

स्थानिक शिया मुस्लिम संघटनेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एसजे कथावाला आणि माधव जमादार यांच्या न्यायपीठानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला. याचिकेद्वारा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहरमच्या ताझियाची प्रतिकात्मक मिरवणूक काढण्याची परवानगी मागण्यात आली होती.

राज्य सरकार आणि याचिकाकर्ता ऑल इंडिया इदारा-ए-तहाफुज-ए-हुसैनियत यांच्या शुक्रवारी एक समंजस्य करार झाला. नंतर ही माहिती कोर्टात देण्यात आली. या कराराच्या आधारावर हायकोर्टानं ताझिया मिरवणुकीला सशर्त परवानगी दिली आहे.

कोर्टाच्या आदेशानुसार, शिया मुस्लिम समुदायात्या सदस्यांना केवळ रविवारी (30 ऑगस्ट) मिरवणूक काढण्याची परवानगी आहे. सायंकाळी 4.30 ते 5.30 या कालावधीत निर्धारित करण्यात आलेल्या मार्गावरून ट्रकमधून मिरवणूक काढण्यात येईल. यात पायी चालणाऱ्या भाविकांना परवानगी नाही. ट्रकवर देखील केवळ पाच भाविकांना परवानगी आहे. शेवटचे 100 मीटर केवळ 5 भाविकांना ताझिया घेऊन पायी जाण्याची परवानगी असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे सध्या देशभर सगळ्याच कार्यक्रमांवर बंदी आहे. मोठ्या सभा, कार्यक्रम, मिरवणुकांवर बंदी  घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात कोठेही मोहरम ताझिया मिरवणुकीस परवानगी नाही. याबाबत महाराष्ट्र सरकारनं गाईडलाईनही जाहीर केली आहे.

सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली...

दुसरीकडे, मोहरमच्या मिरवणुकांना परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळून लावली. देशभर मिरवणुकींना परवानगी दिली जाऊ शकत नाही. परवानगी दिली तर कोरोना प्रसारासाठी लोक एकाच समाजाला दोषी धरतील, असं मत देखील सुप्रीम कोर्टानं नोंदवलं.

शिया समाजाचे धर्मगुरु मौलना कल्बे जव्वाद यांनी देशातल्या विविध शहरांमध्ये मिरवणुकींना परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचा सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्यासाठी त्यांनी जगन्नाथ रथयात्रेला दिलेल्या परवानगीचं उदाहरणही दिलं होतं. मात्र ती यात्री ही फक्त एका शहरासाठीच होती. देशभर मिरवणुका काढण्याचा प्रश्न नव्हता असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

हेही वाचा...सच्चा कोरोना योद्धा! डॉक्टरनंच अ‍ॅम्ब्युलन्स चालवून वाचवले कोरोना रुग्णाचे प्राण

यानंतर फक्त लखनऊसाठी परवानगी द्या, अशी मागणी मौलांनांनी केली होती. त्यावर कोर्टाने त्यांना अलाहाबाद हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला. चंद्र दर्शन झालं तर 29 किंवा 30 ऑगस्टपासून हे पर्व सुरु होणार आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 28, 2020, 7:13 PM IST

ताज्या बातम्या