मुंबई, 26 जून: मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध असलेल्या हॉटेल ताजमध्ये (Hotel Taj) बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन (Bomb scare) पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला आहे. हा फोन येताच पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. संपूर्ण हॉटेल आणि परिसरात बीडीडीएस पथकाकडून (BDDS Team) तपास सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याचं म्हटलं. यानंतर तात्काळ पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथक ताज हॉटेल परिसरात दाखल झाले. सध्या ताज हॉटेल आणि परिसरात पोलिसांकडून तपास सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन कंट्रोल रूमला आला होता. त्यानंतर बीबीडीएस आणि पोलिसांच्या पथकाने संपूर्ण मंत्रालय आणि परिसरात तपास केला. मात्र, हा एक बनावट कॉल असल्याचं उघड झालं. तसेच हा फोन नागपुरातून आल्याचंही तपासात समोर आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.