प्रेयसीला खूश ठेवण्यासाठी प्रियकरानं लढवली नामी शक्कल, पण अडकला स्वत:च्याच जाळ्यात!

  • Share this:
मुंबई, 15 डिसेंबर: कोरोनामुळे (Coronavirus) आर्थिक संकटात सापडलेल्या बॉलीवूडमधील (Bollywood) एका लेखकानं मात्र आपल्या प्रेयसीला खूश ठेवण्यासाठी नामी शक्कल लढवल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर या प्रियकरानं अनेकांना लाखो रुपयांचा चूना देखील लावला आहे. पण आपल्या युट्युबर प्रेयसीला खूश ठेवण्याच्या नादात लेखक प्रियकराला आता तुरुंगाची हवा खावी लागली आहे. शुभम शाहू असं आरोपीचं नाव असून तो बॉलीवूडमध्ये छोटा-मोठा स्टोरी रायटर आहे. सध्या तो ओशिवारा पोलिसांच्या ताब्यात आहे. हेही वाचा..धक्कादायक! पुण्यात माजी आमदारांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल स्टोरी रायटींगमधून त्याची चांगली कमाई होत होती. परंतु कोरोनामुळे अचामक मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि शुभम आर्थिक अडचणीत सापडला. शुभमचं लॉकडाऊनमुळे काम बंद झालं. मात्र, प्रेयसीला सतत महागडे गिफ्ट देणं त्यानं बंद केलं नाही. यासाठी त्यानं चित्रपटातील एका फिल्मी फसवणुकीचा फंडा आजमावला. आश्चर्य म्हणजे पहिल्याच झटक्यात फसवणूक करुन शुभमला हजारो रुपये मिळाले. मग काय शुभमनं चक्क स्टोरी रायटींग सोडून फसवणुकीचा नवी धंदा सुरु केला. पैसा मिळवण्यासाठी शुभननं केला बल्क मॅसेजचा वापर शुभमची प्रेयसी एक प्रसिद्ध युट्युबर आहे. अनलॉकनंतर सगळे व्यवहार खुले झाल्याने शुभमनं आपल्या प्रेयसीला बाहेर फिरायला घेवून जाण्यासाठी मुंबईतील एका ट्रॅव्हल कंपनीमार्फत विमानाची तिकिट त्याचबरोबर पंचतारांकित हॉटेलमध्ये बुकिंग केलं. प्रेयसीला महागडे गिफ्ट देण्याकरता पैसे मिळवण्यासाठी शुभनने बल्क मॅसेजचा वापर केला. यासाठी त्यानं इंटरनेटवर त्या ट्रॅव्हल कंपनीमधून या आधी बुकिंग केलं आणि त्याचे पैसे ॲानलाईन ट्रान्सफर केल्यानंतर येणाऱ्या मॅसेजचा फोटो काढून इंटरनेटवर अपलोड केला होता. तोच मॅसेज पाहुन तसाच मॅसेज बनवून त्याने ट्रॅव्हल कंपनीला पैसे पाठवल्याचे भासवलं. हेही वाचा..पुण्यात वाढदिवसाच्या नावाखाली धिंगाणा! बर्थडे बॉयवरच अंड्यांचा वर्षाव फक्त विमानाची तिकिटच नाही तर शुभम यानं प्रेयसीला सोन्याच्या बांगड्या गिफ्ट केल्या होत्या त्याकरता ज्वेलर्सलाही शुभमनं असंच गंडवलं होतं. मात्र, शुभमचा हा फंडा जास्त दिवस चालला नाही. ओशिवारा पोलिसांनी शुभमला अटक केली आहे. बॉलीवूडमध्ये स्टोरी रायटर असलेल्या शुभमनं प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी चुकीचा मार्ग निवडला आणि आता स्वत: चीच एक फिल्मी स्टोरी बनवून बसला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: