बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचं निधन

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचं निधन

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. आज दुपारी ३.३० वाजता वरळीच्या प्रार्थना स्थळ येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील.

  • Share this:

मुंबई, 05 जून- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. वृद्धापकाळात येणाऱ्या आजारांशी ते लढत होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दिनयार यांनी अनेक हिट बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. आज दुपारी ३.३० वाजता वरळीच्या प्रार्थना स्थळ येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील.

दिनयार यांनी '३६ चायना टाउन', 'खिलाडी' आणि 'बादशहा' यांसारख्या सिनेमात काम केलं आहे. दिनयार यांनी आपल्या करिअरची सुरुवात थिएटर आर्टिस्ट म्हणून केली. गुजराती आणि हिंदी नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. दिवंगत अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांना २०१९ मधअये भारत सरकारने पद्धश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यांनी १९६६ मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

First published: June 5, 2019, 11:47 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading