VIDEO: IForIndia कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी धावलं बॉलिवूड, बघा शहारुख, माधुरी आणि अमिरने काय केलं!

VIDEO: IForIndia कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी धावलं बॉलिवूड, बघा शहारुख, माधुरी आणि अमिरने काय केलं!

यात माधुरी दीक्षितने एड शिरान या पॉप गायकाचं गाणं सादर केलं. तिच्या मुलाने पियानो वाजवला.

  • Share this:

मुंबई 04 मे: ‘आय फॉर इंडिया’ हा भारतीय कलाकारांनी कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी केलेल्या कॉन्सर्टला आज फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. अमिताभ बच्चन, शहारुख, अमिर खान, माधुरी दीक्षित पासून जवळपास सगळ्याच बॉलिवूड कलाकार आणि गायकांनी सहभाग घेतला. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याची जोरदार जाहीरात करण्यात आली होती. यात माधुरी दीक्षितने एड शिरान या पॉप गायकाचं गाणं सादर केलं. तिच्या मुलाने पियानो वाजवला आणि माधुरीने या गाण्याने सर्वांनाच मोठं सरप्राईज दिलं. तर अमिर खान आणि किरण राव यांनी गाणं गायलं. काही कलाकारांनी वाद्यं वाजवली, कुणी संदेश दिला तर कुणी अभिनय केला.

सोशल मीडियावर हा कार्यक्रम हिट ठरला आहे. तर तिकडे फार्महाऊसवर असलेल्या सलमानने आज प्रत्यक्ष मदत करत गावकऱ्यांना राशन दिलं.

लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सलमान खान सध्या पनवेलच्या आपल्या फार्म हाऊसवर आहे. कोरोनाचं संकट आल्यापासून सलमान मदतीसाठी पुढे सरसावला. फार्महाऊस जवळच्या खेड्यांमधल्या गावकऱ्यांना त्याने आज अन्न धान्याची मदत केली. या कामात स्वत: सलमान आणि त्याचे सर्व सहकारी सहभागी झाले होते. त्याच्यासोबत त्याची मैत्रीण यूलिया वेंटूर, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस,  बहिण अर्पिता खान आणि काही नातेवाईक तिथे राहत आहेत. त्या सगळ्यांनी मानवी साखळी करून सामानाचं वाटप केलं.

गावकरी आपल्या बैलगाड्या घेऊन फार्महाऊसवर आले होते. त्या सगळ्यांना राशन आणि आवश्यक सामान देण्यात आलं. निघताना सलमान हात जोडून त्यांना धन्यवाद असंही म्हणाला. या आधाही त्याने शेकडो कामगारांना मदत केली आहे.

चित्रपटाच्या सेटवर शुटींगसाठी मदत करणाऱ्या शेकडो कामगारांचं काम सध्या बंद आहे. त्यामुळे त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा कामगारांसाठी त्याने रोख पैसे आणि त्यांच्या राहण्या खान्याची व्यवस्था केली होती.

First published: May 4, 2020, 7:41 AM IST

ताज्या बातम्या