Home /News /mumbai /

करण जोहरच्या पार्टीतील सेलिब्रेटींना कोरोना, या पार्टीत राज्य सरकारमधील मंत्री होता? आशिष शेलारांचा रोख कुणाकडे

करण जोहरच्या पार्टीतील सेलिब्रेटींना कोरोना, या पार्टीत राज्य सरकारमधील मंत्री होता? आशिष शेलारांचा रोख कुणाकडे

करण जोहरच्या पार्टीतील सेलिब्रेटींना कोरोना, या पार्टीत राज्य सरकारमधील मंत्री होता? आशिष शेलारांचा रोख कुणाकडे

करण जोहरच्या पार्टीतील सेलिब्रेटींना कोरोना, या पार्टीत राज्य सरकारमधील मंत्री होता? आशिष शेलारांचा रोख कुणाकडे

Ashish Shelar reaction on Karan Johor party: करण जोहरच्या पार्टीत राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित होता का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई, 16 डिसेंबर : बॉलिवूड सिने निर्माता, दिग्दर्शक करण जोहर (Karan Johor) याने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या सेलिब्रेटींपैकी काहींना कोरोनाचा संसर्ग (Covid19) झाल्याचं समोर आलं. या प्रकरणात आता भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबतच करण जोहोरच्या पार्टीत राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित होता का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आशिष शेलार म्हणाले, करण जोहर यांच्या घरी पार्टी झाली आणि या पार्टीत असलेल्यांपैकी तिघांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या मी वाचल्या. त्या बातम्या वाचून मी बोलतो, त्या पार्टीत आठच लोकं होतं की आणखी माणसं होतं. त्याबाबत सीसीटीव्ही फूटेज किंवा त्या ठिकाणी उपस्थित असलेले ड्रायव्हर आणि इतर उपस्थित असलेल्यांकडून माहिती गोळा केल्याचं दिसत नाहीये. आमचा सवाल मनपाला आहे की, त्या पार्टीत राज्य सरकारमधील कोणी मंत्री होता का? वाचा : आलियाने तोडले कोरोनाचे नियम, दिल्लीतून मुंबईत येताच कारवाईची शक्यता नेमकी किती लोक होती याबाबत त्यांना विचारले की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज घेतले का तर महापालिकेचे म्हणणे आहे की नाही. माझा सवाल आहे की, राज्य सरकारमधला मंत्री त्यात होता का? असा माझा सवाल आहे? यापैकी काही लोकांनी खाजगी लॅबमधून टेस्ट केल्या असे दिसून येत आहे असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. करण जोहरच्या पार्टीत राज्य सरकारमधील कोणी मंत्री हजर होता का? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केल्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे. खरंच पार्टीत मंत्री महोदय उपस्थित होते का आणि होतं तर ते मंत्री कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. करीना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान यांना कोरोना अभिनेत्री करीना कपूर हिला कोरोनाची लागण झाली. करीनासह तिची जवळची मैत्रिण आणि बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे. यानंतर कोरोनाचा शिरकाव सलमान खानच्या कुटुंबातही झाला आहे. सलमान खानची वहिनी आणि सोहेल खानची पत्नी सीमा खानला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे. यासोबतच अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरला देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. करण जोहरच्या डिनर पार्टीमुळे या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ashish shelar, Coronavirus, Mumbai

पुढील बातम्या