बॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवुडनं पाक कलाकारांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 17, 2019 08:13 PM IST

बॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय

मुंबई, 17 फेब्रुवारी : पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर देशातून पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला जातोय. या हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलिवुड देखील रस्त्यावर उतरलं असून त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. गोरेगावमधील फिल्मसिटीमध्ये दुपारी सिनेकलाकार रस्त्यावर उतरले होते. यावेळी ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’कडून (FWICE) पुलवामा हल्ल्याचा निषेध केला गेला. यावेळी पाकिस्तानी कलाकारांना यापुढे बॉलिवुडमध्ये स्थान दिले जाणार नाही. शिवाय, त्यांची गाणी देखील रिलीज केली जाणार नाहीत अशी घोषणा करण्यात आली. दोन तासासाठी काम बंद ठेवत सिनेकलाकारांनी काळा दिवस पाळला.

तसेच माजी क्रिकेटर आणि पंजाबमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर देखील बंदी घालत असल्याची घोषणा FWICEनं केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी दहशतवादासाठी पाकिस्तान देशाला जबाबदार धरता येणार नाही असं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष पाहायाला मिळत आहे. यानंतर सोनी वाहिनीनं देखील त्यांची 'द कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी केली आहे.

कंगनाचा शबाना- जावेद अख्तर यांच्यावर निशाणा

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांचा पाकमधील कार्यक्रम रद्द करत कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कंगना राणौतनं हा सारा ढोंगापणा असल्याची टिका केली होती. त्यावरून शबाना आझमी यांनी देखील कंगनाला प्रत्युत्तर दिलं आहे.

मनसेनं दिला होता इशारा

Loading...

यापूर्वी पाक कलाकारांची गाणी रिलीज करू नका असं पत्र मनसेनं म्युझिक कंपनींना पाठवलं होतं. त्यानंतर आता थेट बॉलिवुडमधून पाक कलाकारांना आऊट करण्यात आलं आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर पाकिस्तानला आता धडा शिकवाच अशी मागणी समस्त देशवासियांकडून होताना दिसत आहे.

VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2019 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...