• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • रेखाजींनी कोरोना चाचणी करून घ्यावी - मुंबईच्या महापौरांचं आवाहन

रेखाजींनी कोरोना चाचणी करून घ्यावी - मुंबईच्या महापौरांचं आवाहन

अभिनेत्री रेखा यांनी आपली Corona चाचणी करून घ्यावी, असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

 • Share this:
  ज्योत्स्ना गंगाणे, 18 जुलै : अभिनेत्री रेखा (Rekha coronavirus news) यांनी आपली Corona चाचणी करून घ्यावी, असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. रेखा यांचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही या ज्येष्ठ अभिनेत्रीने स्वतःची COVID चाचणी करून घेतली नव्हती. अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी आली, त्याच दिवशी आणखी एका बॉलिवूड सेलेब्रिटीच्या घरापर्यंत कोरोना पोहोचल्याचं वृत्त आलं होतं. अभिनेत्री रेखा यांचा बंगला मुंबई महापालिकेने सील केला, कारण त्यांच्या ड्रायव्हरची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर रेखा यांनी आपली कोरोना चाचणी करायची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं होतं. "गेल्या कित्येक दिवसात आपण घराबाहेर पाऊल ठेवलेलं नाही. त्यामुळे संसर्गाचा धोका नाही," असं रेखाने सांगितल्याचं वृत्त होतं. आज News18India शी बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मात्र रेखा यांनी चाचणी करून घ्यावी, असं आवाहन केलं आहे. त्यांच्या चालकाला कोरोना झाल्याला सात दिवस झाले. रेखा यांना कोरोनाची कुठलीही लक्षणं दिसत नसली, तरी त्यांनी चाचणी केली पाहिजे, असं पेडणेकर म्हणाल्या. "रेखा यांचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या प्रकृतीची चिंता त्यांना वाटते. त्यामुळे BMC कडूनच करावी असं नाही, त्यांना वाटलं तर खासगी लॅबमधूनही त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. त्यांची तब्येत ठणठणीत राहावी, अशीच आमची इच्छा आहे", असं पेडणेकर म्हणाल्या. रेखा यांच्या स्टाफपैकी एकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या बंगल्याचं निर्जंतुकीकरण करायला महापालिकेचे कर्मचारी गेल्या आठवड्यात गेले होते. पण त्यानंतर BMC च्या कर्मचाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही, असंही मुंबईच्या महापौरांनी News18 शी बोलताना नमूद केलं.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published: