मुंबई, 03 ऑक्टोबर : मुंबईत (mumbai) गेल्या काही दिवसांपासून अंमली विरोधी पथक अर्थात (NCB) एनसीबीच्या पथकांनी अनेक ड्रग्स तस्कारांचं (Drugs smuggling) कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे मुंबईत ड्रग्स तस्करांचे धाबे दणाणले आहे. अशाच मुंबईच्या धर्तीवरून निघून मोकळ्या समुद्रात ड्रग्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पण, एनसीबीने मोठ्या शिताफीने ही पार्टी उधळून लावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतून नेहमी प्रमाणे Cordelia Cruise हे क्रझ गोव्याला जात असते. ( Cordelia Cruise Ship From Mumbai To Goa) या आलिशान क्रुझवर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. फॅशन शो असल्यामुळे साहजिक बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची मांदियाळी होती. हे क्रुझ शनिवारपासून गोव्याच्या दिशेनं रवाना झाले होते. 3 दिवसांनंतर ते गोव्याला पोहोचणार होते. पण मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना टीप मिळाली होती की, क्रुझवर मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा आला आहे.
त्यामुळे प्रवाशाच्या वेशात एनसीबीचे अधिकारी क्रुझवर दाखल झाले होते. जेव्हा क्रुझ मुंबईहून निघाले आणि मध्य समुद्रात पोहोचले, तेव्हा पहिल्या पार्टीला सुरुवात झाली आणि जिथे ड्रग्जचे सेवन केले जात होते. त्यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली. एनसीबीचे अधिकारी ड्रग्स घेणाऱ्यावर बारीक नजर ठेवून होते. क्रुझवर एनसीबीचे अधिकारी आले आहेत, याबद्दल कुणालाही पुस्टशी कल्पनाही नव्हती. तब्बल सात तास ही कारवाई सुरू होती. यावेळी 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
यामध्ये बॉलिवूडच्या मेगास्टार अभिनेत्याच्या मुलालाही ताब्यात घेण्यात आले. एनसीबीने मुंबईमध्ये अनेक धडक कारवाया केल्या आहे. पण, पहिल्यांदाच अशा प्रकारे कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एनसीबीला मोठ्या प्रमाणात कोकेन आणि MD ड्रग्स जप्त केलं आहे. सात तासांच्या कारवाईनंतर 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व जणांना उद्या रविवारी मुंबईत आणले जाणार आहे.
फॅशन शोच्या नावाखाली ड्रग्स पार्टी
एनसीबीच्या पथकाने मुंबईतील समुद्रात Cordelia या क्रुझरवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटीची या पार्टीला हजेरी होती. या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर केला करण्यात आला अशी माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. या क्रुझवर जवळपास 1500 लोक होती. यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आणि दिल्लीत व्यापाऱ्यांचा समावेश आहे.
या क्रुझवर एक फॅशन शो सुरू होता. त्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्ती आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटी या क्रुझवर हजर होते. NCB ने ही ड्रग्स पार्टी उधळून लावली. जवळपास 1500 लोक या क्रुझवर हजर असल्याची माहिती समोर आली आहे. यात दिल्लीतील मोठे व्यापारी सुद्धा सामील होते. अनेक लोकांकडे ड्रग्स आढळून आले आहे.
NCB चे पथक मागील 20 दिवसांपासून या क्रुझवर नजर ठेवून होते. आतापर्यंत या कारवाईमध्ये 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एनसीबीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्यांदाच एखाद्या क्रुझवर NCB च्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.