बॉलीवूड अभिनेता परेश रावल यांच्या ड्रायव्हरवर बलात्काराचा आरोप

बॉलीवूड अभिनेता परेश रावल यांच्या ड्रायव्हरवर बलात्काराचा आरोप

बॉलीवूड अभिनेता आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल यांच्या ड्रायव्हरला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट- बॉलीवूड अभिनेता आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल यांच्या ड्रायव्हरला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी अशोक मागील 10 वर्षांपासून परेश रावल याच्याकडे नोकरी करत आहे. डीएन नगर पोलिसांनी आरोपी अशोकविरुद्ध 376 ,50, 67 आणि 67 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी हा परेश रावल आणि त्यांची पत्नी सम्पत स्वरूप यांच्या गाडीवर ड्रायव्हर आहे. डीएन नगर पोलिसांनी अशोकला 16 ऑगस्टला अटक केली. पोलिसांचे एक पथक अशोकला अटक करण्यासाठी परेश रावल यांच्या बंगल्यावर पोहोचले होते. मात्र, तो घरी सापडला नाही. नंतर पोलिसांनी परेश रावल यांचा दुसरा ड्रायव्हर दुर्गेश यांच्या मदतीने सापळा रचून जुहू परिसरातून अशोकच्या मुसक्या आवळल्या. पोलिस पुढील चौकशी करत आहेत. दरम्यान, परेश रावल हे गुजरातमधील अहमदाबाद येथील भाजपचे माजी खासदार आहेत. यंदा मात्र त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही.

परेश रावल म्हणाले,'आज खरा स्वातंत्र्य दिवस'

गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू- काश्मीरमधून कलम 370 अंतर्गत विशेष अधिकार हटवण्याचा प्रस्तावावर परेश रावल यांनी प्रतिक्रिया दिली होती. सरकारच्या निर्णयाचे त्यांनी कौतुकही केले होते. परेश रावल यांनी केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीर पुनर्रचनेच्या प्रस्तावाचे स्वागत केले होते. परेश यांनी ट्विटरवर लिहिले की, 'तुम्ही अगदी माझ्या मनातले बोललात. जय हिंद.'

परेश यांनी एका युझरच्या ट्वीटला रीट्वीट करत आपले मत दिले. युझरने ट्वीटमध्ये म्हटलं की, 'देशाला स्वातंत्र्य मिळताना पाहण्याची संधी मला मिळाली नाही. कश्मीरला कलम 370 आणि 35अ पासून मुक्ती मिळाली हे पाहणे माझ्यासाठी खास होते. भारत माता की जय.' या ट्वीटला परेश यांनी रीट्वीट केले. अजून एका ट्वीटमध्ये रावल यांनी आज खरा स्वातंत्र्य दिवस असल्याचे म्हटले.

VIDEO: 'काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची जत्रा झाल्यानं यात्रा रद्द झाली', मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

First published: August 23, 2019, 11:23 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading