S M L

अजय देवगणला पितृशोक, वीरू देवगण कालवश

गेल्या काही दिवसांपासून वीरू यांची तब्येत सातत्याने खालवत होती. यामुळे अजय देवगणने ‘दे दे प्यार दे’ सिनेमाचं प्रमोशन अर्ध्यावर सोडलं होतं.

News18 Lokmat | Updated On: May 27, 2019 04:05 PM IST

अजय देवगणला पितृशोक, वीरू देवगण कालवश

मुंबई, 27 मे- बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचं आज निधन झालं. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत खालावत होती. सांताक्रुझच्या सूर्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. वीरू प्रसिद्ध स्टंट आणि अ‍ॅक्शन कोरिओग्राफर तसेच दिग्दर्शक होते. त्यांनी ८० हून जास्त सिनेमांसाठी अ‍ॅक्शन कोरिओग्राफी केली आहे.

याशिवाय ‘हिंदुस्तान की कसम’ नावाच्या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. फक्त अ‍ॅक्शन आणि दिग्दर्शनच नाही तर वीरू यांनी अभिनेता म्हणूनही अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. ‘क्रांती’ (१९८१), ‘सौरभ’ (१९७९) आणि ‘सिंहासन’ (१९८६) या सिनेमांत त्यांनी अभिनयही केला होता. अ‍ॅक्शन दिग्दर्शक म्हणून त्यांचे ‘फूल और कांटे’, ‘हिम्मतवाला’, ‘प्रेम रोग’, ‘क्रांती’, ‘दो और दो पांच’ हे सिनेमे तुफान गाजले होते.

वीरू यांना पार्टी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात जाणं फारसं पसंत नव्हतं. कामाव्यतिरिक्त ते घरत राहणं जास्त पसंत करायचे. त्यांना अजयच्या ‘टोटल धमाल’ सिनेमाच्या स्क्रीनिंगला शेवटचं पाहण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून वीरू यांची तब्येत सातत्याने खालवत होती. यामुळे अजय देवगणने ‘दे दे प्यार दे’ सिनेमाचं प्रमोशन अर्ध्यावर सोडलं होतं. यानंतर त्याने संपूर्ण वेळ वडिलांसोबत घालवण्याचा निर्णय घेतला होता.


राज्यात मान्सून लांबण्याची शक्यता, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2019 02:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close