ठाणे पालिकेच्या COVID हॉस्पिटलमध्ये मुन्ना भाई MBBS, प्रशासन गेलं हादरून

ठाणे पालिकेच्या COVID हॉस्पिटलमध्ये मुन्ना भाई MBBS, प्रशासन गेलं हादरून

ठाण्यातल्या कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णावर उपचार करणारे काही डॉक्टर्स आणि कर्मचारी हे बोगस आहेत अशी घटना समोर आलीय.

  • Share this:

ठाणे 19 ऑक्टोबर: ठाणे महापालिकेच्या कोवीड रुग्णालयात मुन्ना भाई MBBS सारखी घटना घडली आहे. बोगस डॉक्टर आढळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सध्या कोरोनाचं संकट असताना कोविड हॉस्पिटलमध्येच बोगस डॉक्टर आढळल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे पालिकेच्या ग्लोबल करोना हॉस्पिटलमध्ये असा डॉक्टर आढळून आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या बोगस डॉक्टरावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी राष्टवादी काँग्रेसने केली आहे.

कोविडचा प्रदूरभाव टाळण्यासाठी व गरीब रुग्णाना कोविड  इस्पितळ उपलब्ध व्हावे यासाठी ठाण्यातील बाळकुम येथील ठाणे पालिकेने जवळपास अकराशे खाटांचे ग्लोबल  कोविड रुग्णालय उभे केलं आहे. रुग्णांना त्याचा फायदा ही झाला आणि हे रुग्णालय ठाण्यात संजीवनी ठरले. परंतु आता याच रुग्णालयात कोविड रुग्णावर उपचार करणारे काही डॉक्टर्स आणि कर्मचारी हे बोगस आहेत अशी घटना समोर आलीय. यात 2 इंटरशिप पूर्ण न केलेले तर 1 डॉक्टर हा विदयार्थी असल्याचं आढळून आलं आहे.

अश्या तीन बोगस डॉक्टरांना पालिका अधिकाऱ्यांनी पकडून त्यांच्याबद्दल अहवाल तयार करून पालिका आयुक्तांकडे पाठवला आहे. या रुग्णालयात डॉक्टर देण्याचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते. आणि त्याच्याकडूनच या बोगस डॉक्टरांची भरती करण्यात आलेची सूत्रांची माहिती आहे.

तर या बाबत आम्ही चौकशी करतोय अशी  सारवासारव पालिका अधिकाऱ्यांनी केली आहे. हा धक्कादायक प्रकार असून रुग्णाच्या जीवाशी खेळ आहे. यावर कडक करवाई झाली पाहिजे आणि चौकशी अंतर्गत जर हे तिन्हीही डॉकटर दोषी आढळले तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी राष्टवादीचे गटनेता नजीब मुल्ला यांनी केली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 19, 2020, 9:52 PM IST

ताज्या बातम्या