बोटीवरचा थरार...जेवण का बनवलं नाही विचारताच नोकराने घेतला जीव

खून केल्यानंतर बनाव रचून तो बपत्ता असल्याचं भासवण्याचा प्रयत्न त्याने केला, मात्र पोलिसांनी अवघ्या 48 तासात आरोपींना शोधून काढलं आणि त्याची तुरुंगात रवानगी केली.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2019 09:19 PM IST

बोटीवरचा थरार...जेवण का बनवलं नाही विचारताच नोकराने घेतला जीव

विजय देसाई, भाईंदर 25 सप्टेंबर : उत्तन जवळच्या किनाऱ्यावर असलेल्या बोटीवर थरार घडलाय. बोटीवर काम करणाऱ्या नोकराला तु जेवण का बनवलं नाही, नीट काम का करत नाही अशी विचारणा केली असता त्याने विचारणाऱ्या सुपरवायझरचीच हत्या केली. नंतर बनाव रचून तो बपत्ता असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी अवघ्या 48 तासात आरोपींना शोधून काढलं आणि त्याची तुरुंगात रवानगी केली. सांन्तु राम हरिराम (34) असं हत्या झालेल्या पीडिताचं नाव आहे. आरोपी रामस्वामी भुवणेश्वर श्रीवास (28) याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 302, 201 या कलमाखाली उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पत्नीच्या मृतदेहाशेजारी रात्रभर बसून होते आजोबा, सरपंचांनी दिला 'माणुसकीचा खांदा

उत्तन परिसरातील सागरी किनारा पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे 1 च्या सुमारास लेन्सन कोतवार(49) यांनी बनाव रचत बोटीवर मासेमारी करणारा हरिराम  हा रविवारी सकाळी 5 वाजल्या पासून बोटीवर शोध घेऊन ही मिळून आला नाही अशी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. तक्रारी नंतर उत्तन पोलीस स्टेशनचे सूरज शिंदे व कर्मचारी आणि गावचे पोलीस पाटील व काही मासेमारांच्या मदतीने शोध घेतला. त्यासाठी ते  बोटीच्या सहाय्याने 600 किलो मीटर अरबी समुद्रात मात्र त्यांना काहीही आढळून आले नाही. नंतर पोलिसांनी जेव्हा बोटीवर जाऊन बघितले तेव्हा त्यांना बोटीच्या केबिनमध्ये काही रक्ताचे डाग दिसून आले.

मध्य प्रदेशातल्या 'हनी ट्रॅप'चं 'हे' आहे महाराष्ट्र कनेक्शन, राजकारण्यांचा सहभाग

यावरून पोलिसांना संशय आला. सांतू याला कोणी तरी जाड अवजाराने मारून पाण्यात टाकले आहे अशी त्यांना शंका आली. पोलिसांनी अधिक शोध घेतला असता जेटी बंदर पासून 150 किमी वर त्यांना एक शव आढळून आले. कोतवार यांनी हा आपल्याकडे काम करणारा सांतु असल्याचे सांगितले. या वरून त्याला मारून मरण्या करता पाण्यात टाकल्याची पोलिसांनी खात्री केली.  बोटीवर काम करणाऱ्या इतर साथीदारांची पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांना माहिती मिळाली की बोटीवर काम करणारे रामस्वामी भुवणेशवर श्रीवास (28) याचं आणि  सांन्तु राम हरिराम याच्या सोबत कायम भांडण होत असे. रामस्वामी हा बोटीवर कोणतेही काम, मदत करत नव्हता या वरून रवीवारी रात्री सांन्तू याने तू कामात मदत का करत नाही ,जेवण बनवण्यास का मदत केली नाहीस अशी विचारणा त्याच्याकडे केली.

Loading...

औरंगाबादेत तिसरा खून.. दुचाकी देत नाही म्हणून नशेखोरांनी केली तरुणाची हत्या

तेव्हा त्याचा राग येऊन त्याने त्याला ओढत बोटीवरील केबिन मध्ये नेले व त्याच्या डोक्यावर जाळे ओढण्याचा लोखंडी रॉडने त्याची हत्या केली. आणि त्याला समुद्रात ढकलून दिले. बोटीवरच्या काही लोकांनी त्याचा बचाव करण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांनाही त्याला वाचवण्यास येऊ दिलं नाही आणि दमही दिला अशी माहितीही पोलिसांना दिली. एवढेच नाही तर बोटीच्या मालकांनाही ही घटना सांगू दिली नाही. पोलिसांनी आरोपी रामस्वामी भुवणेशवर श्रीवास याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबुल केला अशी माहिती उत्तन सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस निकम यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 09:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...