मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai : भिंती रंगवून जमा केले पैसे, आता चक्क समुद्रात भरवलं प्रदर्शन! पाहा Video

Mumbai : भिंती रंगवून जमा केले पैसे, आता चक्क समुद्रात भरवलं प्रदर्शन! पाहा Video

X
Boat

Boat exhibition sea हे प्रदर्शन पाहण्‍यासाठी निसर्गप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

Boat exhibition sea हे प्रदर्शन पाहण्‍यासाठी निसर्गप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 30 जानेवारी : आज पर्यंत तुम्ही अनेक प्रदर्शन पाहिली असणारं मात्र समुद्राच्या आत मध्ये भरलेलं प्रदर्शन तुम्ही नक्कीच पाहिलं नसेल. मुंबईतील अर्नाळा समुद्रावर हे प्रदर्शन भरविण्यात आलं आहे. विरार येथील अर्नाळा परिसरात राहणाऱ्या राकेश पाटील या तरुणाने बोटीचे प्रदर्शन भरविल आहे. हे प्रदर्शन पाहण्‍यासाठी निसर्गप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

    कसं आहे हे प्रदर्शन? 

    राकेश याने लाकडापासून बोटी तयार केल्या आहेत. 1 फुटांपासून ते 5 फूट येवढ्या लांबीच्या बोटी तयार करण्यात आल्या आहे. अर्नाळा समुद्रावर हे प्रदर्शन चक्क पाण्यात भरविण्यात आलं आहे. समुद्रात भरती असते त्यावेळी या बोटी पाण्याच्या आत मध्ये असतात. अहोटी असेल तेव्हा पाणी समुद्रात परत गेल्यावर या बोटी पाण्याच्या बाहेर दिसतात. संपुर्ण निसर्गावर अवलंबून हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

    या बोटीचा समावेश 

    आय एन एस विक्रांत, युद्ध नौका, माल वाहतूक 8 बोटी, प्रवासी बोटी, क्रुझ अश्या प्रकारच्या हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या बोटी या प्रदर्शनात आहेत. रंग काम, नक्षी काम सर्व गोष्टी हुबेहूब बनविण्यात आल्या आहेत.

     चार दिवस पाहता येणार प्रदर्शन 

    राकेश पाटील सांगतो की, मी रहेजा स्कूल ऑफ आर्टस् येथे शिक्षण घेतलेले आहे तर बडोदा येथून पेंटिंग मध्ये मास्टर पूर्ण केलेले आहे. समुद्रात भरलेलं प्रदर्शन हे दर 15 दिवसांनी चार दिवस पाहता येऊ शकते. अर्नाळा समुद्रावर किल्ल्याच्या जवळ हे प्रदर्शन भरविण्यात आल आहे. लाकडापासून बोटी तयार करण्यात आल्या आहे व यामध्ये काही टिव्ही किंवा टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तूंचा उपयोग करण्यात आला आहे. बोट बुडल्यावर किंवा पाण्यात असताना त्यावर कश्या प्रकारे शेवाळ, कोरल, कालव फुटतात. हे मोठ्या आकारात होतं. मात्र छोट्या आकारात बोटी बनविल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना हे कसं होत ते जवळून अनुभवता येणार आहे.

    'त्या' घटनेनंतर सिव्हिल इंजिनिअरनं बदलली लाईन, कल्याणला पुरवतो फ्रेश मासे, Video

    या बोटी तयार करण्यासाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागला. यासाठी 70 ते 80 हजार रुपये इतका खर्च आला आहे. हे पैसे इतरांच्या  घरातील भिंती रंगवून जमा केले होते आणि घरच्यांनी पाठींबा दिला. कोळी समाजातला असल्यामुळे समुद्राशी नातं आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी मोठे प्रकल्प करण्याचा मानस आहे, असं राकेश पाटीलने सांगितले.

    First published:

    Tags: Local18, Mumbai