पर्यटकांची बोट समुद्रात उलटली, महिलेचा मृत्यू तर चिमुरडी अत्यवस्थ

पर्यटकांची बोट समुद्रात उलटली, महिलेचा मृत्यू तर चिमुरडी अत्यवस्थ

कल्याण, ठाणे परिसरातील पर्यटकांचा एक समुह देवबागमध्ये पर्यटनासाठी आला होता.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 5 डिसेंबर: मावलण तालुक्यातील देवबाग संगम खाडीत पर्यटकांची बोट उलटल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून एक चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. गुरूवारी दुपारी सव्वा 12 च्या सुमारास ही घटना घडली. कल्याण, ठाणे परिसरातील पर्यटकांचा एक समुह देवबागमध्ये पर्यटनासाठी आला होता. बोटिंग सफर करताना ही घटना घडली.

समुद्रात वाऱ्यांचा आणि लाटांचा जोर वाढला होता. बोटीतील पर्यटकही बोटीच्या एका बाजूला गेले. यामुळे ही घटना घडली असावी, अशी चर्चा आहे. माया आनंद माने वय-60, रा आंबिवली, कल्याण) असे मृत महिलेचे नाव आहे. तर अनया अमित अणसुळे, (वय-3, रा. बदलापूर) असे चिमुरडीचे नाव आहे. अनया अत्यवस्थ असून तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेली माहिती अशी की, कल्याण, ठाणे परिसरातील पर्यटकांचा एक समुह देवबाग खाडीपात्रात बोटिंग करत होते. देवबाग संगम परिसरात त्याची बोट उलटली. 9 पर्यटक समुद्रात फेकले गेले. त्यात 5 महिला, एक पुरुष आणि 3 चिमुरड्यांचा समावेश होता. स्थानिक मच्छीमार तातडीने मदतीला धावून आले. मच्छीमारांनी सगळ्यांना पाण्याबाहेर काढून त्यांना उपचारासाठी मालवणमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. माया माने या महिला पर्यटकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 3 वर्षांची चिमुरडी अनया ही अत्यवस्थ आहे. तिचा प्रकृती चिंताजनक असून तिला अन्यत्र उपचारासाठी हलवण्यात येणार आहे. तर इतर आठ पर्यटकांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दोन महिला आणि एका लहान मुलांवर उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2019 05:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading