मराठा मोर्चासाठी बीएमसीकडून खास सुविधा, जाणून घ्या इथं !

आझाद मैदानासाठी मुंबई महापालिका मराठा मोर्चासाठी कुठलेही शुल्क आकारणार नाहीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2017 08:32 PM IST

मराठा मोर्चासाठी बीएमसीकडून खास सुविधा, जाणून घ्या इथं !

08 आॅगस्ट : मुंबईतल्या मराठा मोर्चासाठी मुंबई महापालिकेने जय्यत तयारी केलीये. एरव्ही मोर्चासाठी मुंबई महापालिका कोणतीही विशेष तयारी करत नाही. पण मराठा मोर्चा याला अपवाद आहे. विशेष म्हणजे, आझाद मैदानासाठी मुंबई महापालिका मराठा मोर्चासाठी कुठलेही शुल्क आकारणार नाहीये.

मुंबईच्य़ा आझाद मैदानावर यापूर्वी ही अनेक मोर्चे झाले...अगदी मोठ्यात मोठ्या मोर्चापासून ते एकट्या व्यक्तिच्या आंदोनलापर्यंत प्रत्येक गोष्टीची साक्ष हे मैदान देत आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापुढे असलेल्या या मैदानात कधी गोंधळ उडालाच तर पालिकेचे सुरक्षारक्षक दार लावून घेतात. आजवरच्या सगळ्या मोर्चांकडे तटस्थपणे पाहणाऱ्या बीएमसीनं मराठा मोर्चासाठी छुकतं माप का द्यावं हा प्रश्न मात्र पडतोय.

मराठा मोर्चासाठी आझाद मैदानावर प्रवेशद्वारासाठी भिंत तोडण्यात आली आहे. बाॅम्बे जिमखानाच्या समोरची पायवाट तोडून त्याठिकाणी मोठा 40 फुटी रस्ता तयार करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे आजवर कुठल्याही मोर्चासाठी फिरते टाॅयलेट देतांना पालिका आय़ोजकांकडून पैसे आकारते. मराठा मोर्चासाठी मात्र टाॅयलेट,पाणी आणि डाॅक्टरांची सुविधासुद्धा मोफत पुरवली जाणार आहे.

या मार्गावर 15 टाॅयलेट उभे करणार

प्रतिक्षा नगर नाल्यावर 2

Loading...

जे के केमिकल नाला 3

सिमेंट यार्ड बीपीटी 4

भायखळा 2

एटीएस कार्यालय 1

आझाद मैदान 2

बीएमसीची पाण्याची व्यवस्था

वसंतदादा पाटील काॅलेज सायन 2

आझाद मैदान 2

बीपीटी सिमेंट यार्ड- 4

राणीची बाग 1

आझाद मैदान 1

वैद्यकीय सूुविधा

प्रियदर्शनी 20 डॉक्टर

राणीबाग- 20 डॉक्टर

जे.जे उड्डान पूल- 20 डॉक्टर

सिमेंट यार्ड बीपीटी 4

 भायखळा 2

एटीएस कार्यालय 1

आझाद मैदान 2

बीएमसीची पाण्याची व्यवस्था

वसंतदादा पाटील काॅलेज सायन 2

आझाद मैदान 2

बीपीटी सिमेंट यार्ड- 4

राणीची बाग 1

आझाद मैदान 1

वैद्यकिय सुविधा

प्रियदर्शनी 20 डॉक्टर

राणीबाग- 20 डॉक्टर

जे.जे उड्डान पूल- 20 डॉक्टर

सीएसस्टी रेल्वे स्टेशन- 20 डॉक्टर

आझाद मैदान 20 डॉक्टर

बीपीटी यार्ड- 10 डॉक्टर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2017 08:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...