बेस्टचा चालक माणूस आहे की मशीन? प्रवाशांना गारेगार वारा आणि चालकाला मात्र...

बेस्टचा चालक माणूस आहे की मशीन? प्रवाशांना गारेगार वारा आणि चालकाला मात्र...

बेस्ट प्रशासनाचा अजब न्याय, एसी बस च्या चालकाला ना एसीची हवा मिळतेय ना बाहेरची हवा. चढलेल्या पाऱ्यात चालकाची घुसमट होते आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रवारी - मुंबईचं तापमानाने 38 अंशाचा पारा ओलांडला तोही भर थंडीच्या मोसमात. अशात मुंबईकरांना या उन्हाचा त्रास होतो आहे. त्यामुळे हळूहळू बेस्ट च्या एसी मिनी बसला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लोकांना थंड हवा मिळते आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी बेस्टच्या चालकाचं काय हा प्रश्न निर्माण होतो आहे. हा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारमही तसंच आहे. कारण एसी बेस्ट बसचं सारथ्य करणाऱ्या चालकाला मात्र उन्हाचा तडाखा सहन करावा लागतो आहे.

तुमच्या कारला एसी चा वारा मिळावा यासाठी दोन्हीबाजूला दोन गोल कोपरे असतात. पण या एसी बस मध्ये काही सोयच नाही. इतकंच काय पण खिडक्याही बंद ठेवत असल्यानं हवाही येऊ शकत नाही. बेस्टने मोठ्या दिमाखात एसी बस सुरू केल्या आहेत. ज्याची संख्या जवळपास 350 इतकी आहे. मुख्य गर्दीच्या ठिकाणी या बस सुरू केल्याने आणि कमी तिकीट दर असल्याने प्रवासी या बसला अधिक पसंती देत आहेत. या मिनी बस मध्ये वाहक (कंडक्टर) नसतात. मुख्य स्थानकावर याचं तिकीट काढणारे वाहक उभे करण्यात आले आहेत. म्हणजेच बसची अख्खी मदार ड्राइवरवर अवलंबून आहे. तिला सुरक्षित चालवणं, अपघात होऊ नये म्हणून काळजी घेणं आणि बेस्टच्या प्रवाशांनी कोणतं नुकसान करू नये हेही पाहणं. पण चालकालाच बेस्टने दुर्लक्षित केलं आहे. नाव न लिहिण्याच्या अटीवर ड्राइवरने सांगितलं की ' तसंही या एसी बसमधून फारशी गार हवा येत नाही, त्यात आम्हाला तोंडासमोर हवा येण्यासाठी काही सोय नाही. कसा जाईल मे महिना? असा प्रश्न आता या चालकांसमोर आहे.

पाहा PHOTOS प्रियंका गांधींच्या लग्नाचा 23वा वाढदिवस, शेअर केले खासगी

बेस्टला जर तोटा होतो आहे आणि अधिकचा तोटा होऊ नये, प्रवासी संख्या वाढावी म्हणून या मिनी बस रस्त्यावर आणल्या गेल्या आहेत. पण मुंबईकर आणि ड्राइवर हा काही इतर प्राणी नाही की त्याला अशी वागणूक मिळावी. यासंदर्भात बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांचं म्हणणं आहे की' ड्राइवर बिचारे आपली नोकरी टिकावी म्हणून कशाही परिस्थितीत काम करत आहेत. मला याबद्दल सांगण्यात आलं आहे की, "चालकांनी तक्रारी केलेल्या नाहीत. पण मी याबाबत महाव्यवस्थापकांशी बोलणार आहे."

वाचा - लिंगायत मठाधिपतीपदी प्रथमच मुस्लीम मुल्ला; बसवेश्वरांचे आहेत भक्त

बेस्टचे ड्रायव्हर आणि वाहकांच्या मुजोरीचे अनेक किस्से घडत असतात. सुटे पैसे द्यायला नाकारणं, मुख्य थांब्यापासून गाडी दूर उभी करणं, अनेक अपघातांना कारण ठरणं. पण त्यांच्यावर कारवाई होते. शिक्षा किंवा दंड केला जातो. पण एसी बसमध्ये असूनही एसीची हवा जाऊद्या पण बाहेरची हवा घ्यायचीही साधी सोय या गाडीत नसावी? याला काय म्हणावं हा प्रश्नच आहे.

----------------

हेही वाचा

VIDEO '15 कोटी आहोत पण 100 कोटींवर भारी आहोत', वारिस पठाण यांची चिथावणी

संभाजी महाराजांना अटकेनंतरचे मालिकेचे भाग दाखवू नये, शिवसेना नेत्याची मागणी

तिरंग्यासाठी जीव टाकला धोक्यात, शिपायाच्या पराक्रमाला मुख्यमंत्र्यांचा सलाम

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: #MumbaiBMC
First Published: Feb 20, 2020 04:03 PM IST

ताज्या बातम्या