कोरोना नियमांबाबत BMC ची मोठी कारवाई; दुबईतून येणाऱ्या चौघांविरोधात FIR दाखल

कोरोना नियमांबाबत BMC ची मोठी कारवाई; दुबईतून येणाऱ्या चौघांविरोधात FIR दाखल

मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने पालिकेकडून कडक कारवाई केली जात आहे.

  • Share this:

मुंबई, 21 फेब्रुवारी : कोरोना नियम तोडणं सहा जणांना महागात पडलं आहे. मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने पालिकेकडून कडक कारवाई केली जात आहे. आता कोरोना नाही असं समजणाऱ्या व नियम मोडणाऱ्यांविरोधात पालिकेकडून थेट एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

परदेशातून भारतात येणाऱ्यांना सात दिवस क्वारंटाईन राहणं अनिवार्य आहे. मात्र दुबईतून मुंबई विमानतळावर आलेल्या चार जणांविरोधात सात दिवसांचा क्वारंटाईनचा काळ पूर्ण करण्याआधीच घरी परतल्याचा आरोप आहे. 10 फेब्रुवारी रोजी दुबईतून भारतात परतल्यानंतर चारही आरोपींना अंधेरीतील एका हॉटेलमध्ये थांबवण्यात आलं होतं. येथे नियमांनुसार त्यांना 7 दिवसांचं इन्स्टिट्यूशल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं होतं. (BMCs major action on corona rules FIR filed against four from Dubai ) मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टर हॉटेलमध्ये चारही प्रवाशांची तपासणी करण्यासाठी गेले असता ते हॉटेलमधून गायब झाले होते. त्यानंतर पालिकेने या चोघांविरोधात कडक कारवाई केली. सुशील सबनीस, जुबेर घालटे, निकिता चंदेर, स्वपन चंद्रदास अशी या चोघांची नावे आहेत. चौघांविरोधांत अंधेरी पोलिसांनी 188,269, 270 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा-VIDEO : लग्नातील आचारीचं धक्कादायक कृत्य; पोळीवर थुंकत असल्याचा किळसवाणा प्रकार

दरम्यान देशभरात कोरोना रुग्णांच्या (Corona Virus) संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. यात महाराष्ट्र, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यासारखी राज्य आघाडीवर आहेत. देशभरात कोरोना लसीकरणाला (Corona Vaccine)  सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, अशातच रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढून लागल्यानं चिंतेत वाढ झाली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: February 21, 2021, 11:52 AM IST

ताज्या बातम्या