मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईतील Oxygen तुटवडा होणार दूर, हवेतून प्राणवायू निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांची लवकरच उभारणी

मुंबईतील Oxygen तुटवडा होणार दूर, हवेतून प्राणवायू निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांची लवकरच उभारणी

महानगरपालिका प्रशासनाने एकूण 12 रुग्णालयांमध्ये मिळून 16 प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प (Oxygen Generation plant in Mumbai)उभारण्‍याचे  निश्चित केले आहे. यामध्‍ये वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्माण करुन तो रुग्‍णांना पुरवण्‍यात येईल.

महानगरपालिका प्रशासनाने एकूण 12 रुग्णालयांमध्ये मिळून 16 प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प (Oxygen Generation plant in Mumbai)उभारण्‍याचे निश्चित केले आहे. यामध्‍ये वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्माण करुन तो रुग्‍णांना पुरवण्‍यात येईल.

महानगरपालिका प्रशासनाने एकूण 12 रुग्णालयांमध्ये मिळून 16 प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प (Oxygen Generation plant in Mumbai)उभारण्‍याचे निश्चित केले आहे. यामध्‍ये वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्माण करुन तो रुग्‍णांना पुरवण्‍यात येईल.

पुढे वाचा ...
  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 24 एप्रिल : कोरोना रुग्णसंख्येत (Corona Cases) झालेल्या वाढीनंतर प्राणवायू पुरवठ्याबाबत अनेक अडचणी येत आहेत. अशात आता बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्राणवायू उपलब्‍धतेबाबत कायमस्‍वरुपी उपाययोजना म्‍हणून एकूण 12 रुग्णालयांमध्ये मिळून 16 प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प (Oxygen Generation plant in Mumbai)उभारण्‍याचे निश्चित केले आहे. यामध्‍ये वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्माण करुन तो रुग्‍णांना पुरवण्‍यात येईल. या सर्व 16 प्रकल्‍पांतून मिळून प्रतिदिन एकूण ४३ मेट्रिक टन प्राणवायू साठा निर्माण होणार आहे. त्यामुळे, प्राणवायू पुरवठ्यावरील महानगरपालिकेचे परावलंबित्‍व कमी होण्‍यासही मदत होणार आहे. यासाठीच्या निविदाही यापूर्वीच मागविण्यात आलेल्या आहेत.

प्राणवायू प्रकल्‍पांची आवश्‍यकता का?

• कोरोनाच्‍या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात सर्वत्र रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बाधित रुग्‍णांच्‍या फुप्‍फुसांना होणारा संसर्ग लक्षात घेता, त्यांना सातत्‍याने आण‍ि अधिक क्षमतेने प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवावा लागतो. यामुळे देशभरातील रुग्‍णालयांकडून प्राणवायूची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

• असे असले तरी प्राणवायू उत्‍पादक आणि वाहतूकदारांच्‍या क्षमता व मर्यादा लक्षात घेता तसेच प्राणवायू उत्‍पादन, पुरवठा व वाहतूक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्‍या मर्यादा पाहाता मागणी व पुरवठा यांचा मेळ घालताना सरकार, प्रशासन यांची कसरत होत आहे.

• या सर्व स्‍थ‍ितीला मुंबईदेखील अपवाद नाही. वेळप्रसंगी प्राणवायू पुरवठ्याअभावी कोरोनाबाधित रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरीत करावे लागले आहे. आहे.

• कोणत्‍याही अडथळ्याविना व सातत्‍याने रुग्‍णांसाठी प्राणवायू साठा उपलब्‍ध होणे आवश्‍यक असते. सध्‍या प्राणवायू उपलब्‍ध करुन देताना होणारी कसरत पाहता प्रशासनाने पालिकेच्‍या रुग्‍णालयांमध्‍ये स्‍वतःचे प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प उभारण्‍याचे ठरवले आहे. परिणामी प्राणवायू उपलब्‍धतेतील अडथळे कमी होतील.

• विशेष म्‍हणजे प्राणवायू पुरवठादारांकडून जंबो सिलेंडरद्वारे मिळणाऱ्या प्रती लीटर प्राणवायू खर्चाशी तुलना केली तर त्‍याच्‍यापेक्षा अर्ध्‍याहून अधिक कमी दराने या प्रकल्‍पांमधून प्राणवायू निर्मिती होईल. हे प्रकल्‍प किमान १५ वर्षे ते कमाल ३० वर्षे संचालित होवू शकतात. परिणामी महानगरपालिकेच्‍या आर्थिक खर्चात बचत करण्‍यासाठी देखील हे प्रकल्‍प अत्‍यंत उपयुक्‍त ठरणार आहेत.

• प्राणवायू पुरवठ्याची आत्‍यंतिक निकड पाहता, हे १६ प्रकल्‍प उभारण्‍यासाठी महानगरपालिकेने लघू ई-निविदा यांत्रिकी व विद्युत खात्यामार्फत प्रसारित केली आहे.

• निविदा प्रक्र‍िया पूर्ण होवून कार्यादेशास मंजुरी मिळताच एका महि‍न्‍यात हे प्रकल्‍प उभारले जातील.

• या सर्व १६ प्राणवायू प्रकल्‍पातून मिळून प्रतिदिन अंदाजे ३३ हजार घनमीटर (सुमारे ४३ मेट्रिक टन) इतका प्राणवायू साठा निर्माण करणे शक्‍य होणार आहे.

• महानगरपालिकेच्‍या रुग्णालयांची ऑक्सिजनची प्रत्यक्ष निकड, प्रकल्‍प उभारण्‍यासाठी लागणाऱ्या जागेची तसेच तेथील विद्युत पुरवठ्याची उपलब्धता/ क्षमता लक्षात घेवून एक किंवा दोन यंत्रं संबंधित ठिकाणी बसविले जातील.

• या १६ प्रकल्‍पांचा एकूण खर्च अंदाजे ९० कोटी रुपये इतका अपेक्षित आहे.

• या प्रकल्‍पातील संयंत्रांचे आयुर्मान किमान १५ वर्षे असते.

असा तयार होणार प्राणवायू -

• हवेत आधीच प्राणवायू अर्थात ऑक्‍स‍िजन असताना पुन्‍हा तो शोषून नव्‍याने प्राणवायू कसा तयार केला जातो, याचे कुतूहल असणे स्‍वाभाव‍िक आहे वातावरणातील हवा शोषून, पी.एस.ए. (pressure swing adsorption) तंत्राचा वापर करुन रुग्‍णांना प्राणवायू पुरवठा करताना, सर्वप्रथम संयंत्रांमध्‍ये योग्‍य दाबाने हवा संकलित (कॉम्‍प्रेस) केली जाते. त्‍यानंतर ती हवा शुद्ध (फ‍िल्‍टर) करण्‍यात येते. त्‍यामुळे हवेतील अशुद्ध घटक जसे की, धूळ, तेल/इंधन यांचे अतिसूक्ष्‍म कण, इतर अयोग्‍य घटक गाळून वेगळे केले जातात. या प्रक्र‍ियेनंतर उपलब्‍ध झालेली शुद्ध हवा 'ऑक्सिजन जनरेटर'मध्‍ये संकलित केली जाते. ऑक्‍स‍िजन जनरेटरमध्‍ये असलेल्‍या झि‍ओलीट (Zeolit) या रसायनयुक्‍त मिश्रणाद्वारे या शुद्ध हवेतून नायट्रोजन व ऑक्सिजन हे दोन्‍ही वायू वेगळे केले जातात. वेगळा करण्‍यात आलेला ऑक्‍स‍िजन अर्थात प्राणवायू हा योग्‍य दाबासह स्‍वतंत्रपणे साठवला जातो. तेथून तो वाहि‍न्‍या/पाईपद्वारे रुग्‍णांपर्यंत पोहोचवला जातो.

First published:

Tags: BMC, Coronavirus, Mumbai, Oxygen supply