Home /News /mumbai /

BMCचा मोठा निर्णय, 100000 कर्मचाऱ्यांची करणार कोरोना टेस्ट

BMCचा मोठा निर्णय, 100000 कर्मचाऱ्यांची करणार कोरोना टेस्ट

त्यानंतर 24 जून 2020 रोजी 3 लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. म्हणजे 2 लाख ते 3 लाख हा टप्पा 23 दिवसांत गाठला गेला. तर 14 जुलै 2020 रोजी 4 लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. 3 लाख ते 4 लाख चाचण्या हा टप्पा 20 दिवसांत पार पडला.

त्यानंतर 24 जून 2020 रोजी 3 लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. म्हणजे 2 लाख ते 3 लाख हा टप्पा 23 दिवसांत गाठला गेला. तर 14 जुलै 2020 रोजी 4 लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. 3 लाख ते 4 लाख चाचण्या हा टप्पा 20 दिवसांत पार पडला.

रॅपिड टेस्ट पद्धतीने या चाचण्या केल्या जाणार आहेत. केवळ अर्ध्या तासात या चाचणीत निकाल लागतो.

मुंबई 14 एप्रिल: कोरोना मुंबई हातपाय पसरत असताना त्याचा सामना करण्यासाठी लढणारी पहिली फळी आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेचे कर्मचारी. गरज पडल्यास ते सध्या दोन पाळ्यांमध्ये काम करताना दिसत आहेत. फिल्डवर काम करत असल्याने याच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता दाट असते.  रोज कामावर जायचं म्हणजे भीती मनात ठेवून काम करावा लागतं. हीच भीती घालवण्यासाठी मुंबई महापालिकेने आरोग्य सेवेत काम करणाऱ्या 100000 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 16 किंवा 17 एप्रिलपासून ही चाचणी सुरू केली जाणार आहे.  रॅपिड टेस्ट पद्धतीने या चाचण्या केल्या जाणार आहेत. या चाचणीमध्ये रक्ताचे नमुने तपासले जातात. या चाचणीचा निकालही लवकर येतो. केवळ अर्ध्या तासात या चाचणीत निकाल लागतो. म्हणून एकाच दिवसात अनेक जणांची चाचणी करता येणे शक्य होते.  त्यामुळे या पद्धतीची निवड करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकांनी यांनी हे माहिती दिली असून आता भारतातच किट मिळणे सोपे झालेलं इतक्या मोठ्या प्रमाणात या टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण या टेस्ट करण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांचं म्हणणे आहे. महाराष्ट्राला धोका, कोरोना मृत्यूंमध्ये प्रत्येक दुसरा रुग्ण महाराष्ट्रातला मुंबईतला कोरोनाचा प्रसार काही थांबता थांबेना. अतिशय झपाट्याने या काही भागात कोरोनाचा प्रसार होतोय. त्याची साळखी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र त्यात अजुनतरी यश आलेलं दिसत नाही. मुंबईतला जी दक्षिण हा वॉर्ड सर्वात जास्त धोकादायक बनला आहे. गेल्या 12 तासांमध्ये तिथे 28 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या वॉर्डमधल्या रुग्णांची संख्या 308वर गेली आहे. जी दक्षिण या वॉर्डमध्ये वरळी, प्रभादेवी, एलफिन्स्टन हे उच्चभ्रू आणि झोपडपट्टी असलेले विभाग येतात. तर इ वॉर्ड म्हणजे भयखळ्यातील रुग्णसंख्या 125 वर गेली आहे. तिथे 5 रुग्ण वाढले. तर डी वॉर्ड म्हणजे ग्रांट रोडची रुग्णसंख्या107वर गेलीय. तिथे10 रुग्णांची वाढ झाली.

धारावीचा येणार आज निर्णायक 'रिपोर्ट', यावरूनच ठरणार कोरोनाचा संसर्ग!

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आढळली आहे. धारावीमध्ये आज आणखी नवे 6 रुग्ण आढळले आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज सकाळी धारावीत नवे 6 रुग्ण आढळले आहे. 4 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या नवीन रुग्णासह धारावीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता  55 वर पोहोचली आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:

पुढील बातम्या