कमला मिलच्या अग्नितांडवानंतर बीएमसीची अवैध बांधकामावर कारवाई

कमला मिलच्या अग्नितांडवानंतर बीएमसीची अवैध बांधकामावर कारवाई

आज सकाळी लोअर परळ भागातल्या कमला मिल आणि रघुवंशी मिलमधल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केलीये.

  • Share this:

 30 डिसेंबर: लोअर परेलच्या कमला मिल्स कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 निष्पापांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आलीये. आज सकाळी लोअर परळ भागातल्या कमला मिल आणि रघुवंशी मिलमधल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केलीये.

कारवाईसाठी झोनल डीएमसी, वॉर्ड आफिसर, वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांचा समावेश असलेलं पथक यासाठी तयार करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर,मुंबई महापालिकाने अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु केली आहे. आज सकाळी रघुवंशी मीलमध्ये अतिक्रमण विरुद्ध कारवाई सुरू केली आहे.

गुरूवारी मध्यरात्री कमला मिलमध्ये आग लागली होती. या आगीमुळे 20 हून अधिक जण जखमी झाले तर 15 लोकांना आपला जीव गमवावा लागला. या  घटनेचे तीव्र पडसाद आता उमटत आहेत.

या घटनेनंतर आता अवैध अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे याचा आता काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आङे.

First published: December 30, 2017, 11:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading