• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • 'मास्क पहनने का यार अपने..' BMC च्या कर्मचाऱ्याने तयार केलं खास गाणं!

'मास्क पहनने का यार अपने..' BMC च्या कर्मचाऱ्याने तयार केलं खास गाणं!

या गाण्यातील सगळेच कलाकार हे मुंबई महापालिकेच्या क्षयरोग निर्मूलन विभागातील कर्मचारी असून एक क्षयरोग पीडित रुग्णही आहे.

  • Share this:
मुंबई, 11 मार्च :  कोरोना (Corona) संसर्गाच्या काळात मुंबई महापालिकेतील (mumbai municipal corporation) सगळ्याच विभागातील कर्मचारी स्वतःच जीव धोक्यात घालून मुंबईकरांसाठी दिवस रात्र मेहनत घेत आहे. पण, मुंबईकर (Mumbai) मात्र काही ऐकायला तयार नाहीत. मास्क (Mask) सारख्या अत्यावश्यक गोष्टीला ते नाकारताना दिसत आहेत. मास्क लावण्यासंदर्भात मोठाले जाहिरातींचे फलक असो, बेस्ट च्या बस किंवा बस स्टॉपवरची 'मास्क नाही, प्रवेश नाही' ही जाहिरात असो, की क्लीनअप मार्शलचा (Cleanup Marshall) 200 रुपयांचा दंड असो, मुंबईकर कशालाच बधत नाहीत असं दिसतंय. अनेकदा क्लीनअप मार्शलची आणि दंडीत झालेल्या मुंबईकरांची भांडण होतात. याचं भांडणातून उदय झाला एक गाण्याचा. पालिकेच्या टीबी विभागात काम करणारे कर्मचारी शमीम रयीन यांनी तयार केलं एक गाणं, ज्याचे बोल आहेत ' मुँह पे मास्क रखने का,अपने लिए और बुढ़े माँ बाप के लिए, करते है जो तुमसे उनके प्यार के लिये.' या गाण्याच्या माध्यमातून मास्क घालणं किती आणि ओ गरजेचं आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन व्यक्तींच्यात सुरक्षित अंतर राखण गरजेचं असल्याचं महत्व या गाण्यात अधोरेखित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे गाणं शमीम रयीन यांनी पालिकेचा एक रुपयाही न घेता बनवले आहे. या गाण्याच्या शुटिंगसाठी 50 हजार रुपये खर्च झाला असून अंधेरी पूर्व या वॉर्ड ऑफिस मधल्या हेल्थ ऑफिसर डॉ. उर्मिला आणि या गाण्याची संकल्पना मांडली ते माजी सह वैद्यकीय अधिकारी शांताराम नाईक आणि शमीम यांच्या इतर मित्रांनी मिळून हे गाणं तयार केलं. अवघ्या एक दिवसांत गाणं तयार झालं. बजेट अत्यंत कमी असल्याने कॅमेरामन असो, नाहीतर मेकअप आर्टिस्ट असो या सगळ्यांना रयीन यांनी अत्यंत कमी पैशात घडवून आणलं. विशेष म्हणजे, हे गाणं गाणारे गायक यांनी एक रुपयाही घेतला नाही. धक्कादायक! पत्नीने पतीचा खून करून मृतदेह घराबाहेरच पुरला, कारण ठरलं... या गाण्यातील सगळेच कलाकार हे मुंबई महापालिकेच्या क्षयरोग निर्मूलन विभागातील कर्मचारी असून एक क्षयरोग पीडित रुग्णही या गाण्यात घेतला आहे. रोहित सरकळे, मंदार चिंदरकर, अविनाश पाटील, हे पालिकेचे कर्मचारी आणि किरण निकुंभ हे टाटा सोशल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तर फैज सिद्दिकी हा रुग्ण तर हमजा सिद्दीकी हा रुग्णांचा भाऊ अशांनी यात काम केलं आहे. तर  शमीम रयीन हे स्वतः अंधेरीतील पूर्वेतील क्षयरोग निर्मूलन विभागात वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आहेत तर या गाण्यात मास्क न घालणाऱ्या व्यक्तीची भूमिका ते गाणं लिहिणं, संगीत देणं, व्हिडिओचे डायरेक्शन अशा सगळ्या भूमिका निभावल्यात. ‘स्टार किड्स असणं हा शाप की वरदान?’; घराणेशाहीच्या वादात जान्हवी कपूरची उडी शमीम रयीन म्हणतात की, 'एक दिवस माझ्या राहत्या घराबाहेर मी जेव्हा सकाळी जॉगिंग करत असताना मला क्लिनअप मार्शल आणि काही नागरिकांचे भांडण होत असले पाहायला मिळालं. लोकांना वाटतं पालिका 200 रुपये दंड उगाचच आकारते. पण त्यांना कळात नाही की मास्क किती गरजेचा आहे. आणि त्यामुळे मी मास्क वरचं हे गाणं तयार केलं'.
Published by:sachin Salve
First published: