S M L

बीएमसीने ठोठावला मंत्रालयाला दहा हजाराचा दंड!

त्यामुळे ज्या इमारतींनी हमी देत तीन महिन्यांची मुदत मागून घेतली, त्यांना वगळता अन्य १४१ इमारती तसेच सरकारी कार्यालयांना महापालिकेच्या वतीने नोटीस बजावून प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये मंत्रालयासह सारंग, समता इमारत, बॉम्बे हॉस्पिटल तसेच मोठ्या हॉटेल्सचा समावेश आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 29, 2017 11:04 PM IST

बीएमसीने ठोठावला मंत्रालयाला दहा हजाराचा दंड!

मुंबई,29 नोव्हेंबर:  मुंबईत १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या इमारती तसेच हॉटेल्सना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वत:च लावण्याचे निर्देश दिल्यानंतरही याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे ज्या इमारतींनी हमी देत तीन महिन्यांची मुदत मागून घेतली, त्यांना वगळता अन्य १४१ इमारती तसेच सरकारी कार्यालयांना महापालिकेच्या वतीने नोटीस बजावून प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये मंत्रालयासह सारंग, समता इमारत, बॉम्बे हॉस्पिटल तसेच मोठ्या हॉटेल्सचा समावेश आहे.

मुंबईत १०० किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण होणाऱ्या  २०९ सोसायटी आहेत.  या सर्वांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वत:च लावण्याचे आदेश देण्यात आले होते. ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश होते. परंतु यापैंकी ६८ सोसायटींनी मुदत मागवून घेत आपण कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

परंतु १४१ सोसायट्यांकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे अखेर या सर्व सोसायटींना महापालिकेच्या वतीने नोटीस बजावून त्यांच्यावर प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, त्या १४१ सोसायटींना नोटीस देऊन त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचं सांगितले.यामध्ये मंत्रालयाचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 10:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close