Home /News /mumbai /

BMC 'त्या' पाईपलाईनसाठी मोजणार तब्बल 8 कोटी रुपये

BMC 'त्या' पाईपलाईनसाठी मोजणार तब्बल 8 कोटी रुपये

मुंबई महानगरपालिके (BMC)ला टाटा मिलच्या जागेत भूमिगत पाईपलाईन टाकण्यास परवानगी मिळाली आहे. एनटीसीएलनं BMCलापाईपलाईनसाठी ही मान्यता दिलीय.

    मुंबई, 26 मे: मुंबई महानगरपालिके (BMC)ला टाटा मिलच्या जागेत भूमिगत पाईपलाईन टाकण्यास परवानगी मिळाली आहे. नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन लिमिटेड (NTCL)) नं मुंबई पालिकेला पाईपलाईनसाठी ही मान्यता दिलीय. सध्या पूरस्थिती रोखण्यासाठी हिंदमाता येथे भूमिगत पाण्याची टाकी बांधण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे या पाईपलाईनमुळे पाणी रोखण्यास मदत होणार आहे. दरम्यान टाटा मिलची जागा वापरण्यासाठी बीएमसी तब्बल 8.58 लाख मोजणार आहे. एनटीसीएलनं पालिकेकडून या जागेचा वापर करण्यासाठी 8.58 कोटी रुपये शुल्क आकारलं आहे. NTCL नं आपल्या परवानगी पत्रात म्हटलं की, 1600 मिमी व्यासाची पाईपलाईन टाकावी. त्याची तीन मीटर रुंदी आणि 350 मीटर लांबी (कार्यरत जागेसह) असावी. 8 कोटी 56 लाख दिल्यानंतर ही जागा वापरण्यास परवानगी मिळू शकेल. हिंदमाता परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचारा करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. तीन ठिकाणी भूमिगत टाक्‍या बांधण्यात आल्या आहेत. या परिसरातील झेव्हिअर्स मैदानात भूमिगत टाकी बांधण्यात आली आहे. त्यानंतर हे पाणी परळ पासून दादर पश्‍चिमेकडील स्वर्गीय प्रमोद महाजन उद्यानात आणण्यात येणार आहे. येथेही भूमिगत टाकी बांधण्यात आली आहे. हेही वाचा- अन् राज ठाकरे झाले भावूक,  पत्र पाठवून कार्यकर्त्यांना दिला धीर पालिकेनं आधीचं पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्याचं काम सुरु केलं आहे. दरम्यान पालिकेला हिंदमाता ते प्रमोद महाजन पार्क अशा 650 मीटर अंतरापर्यंत 1 हजार 600 मिमी व्यासाची ड्रेन पाइपलाइन घालणं आवश्यक आहे. आम्हाला NTCLकडून मंगळवारी या प्रकल्पासाठी पाईपलाईन टाकण्याची परवानगी मिळाली आहे, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितलं. हेही वाचा- मुंबई: स्तनपान देणाऱ्या मातांच्या लसीकरणासाठी BMC चा मोठा निर्णय प्रमोद महाजन उद्यानातील टाकीमध्ये 60 हजार घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता असेल. तर झेव्हिअर्स मैदानात 30 हजार घनमीटर पाणी साठा होणार असल्याची माहिती बीएमसीच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. भूमीगत पाण्याच्या टाक्यांवर महापालिका जवळपास 135 कोटी रुपये खर्च करत आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BMC, Mumbai muncipal corporation, Rain flood

    पुढील बातम्या