खड्ड्यांच्या रस्त्यांना नवा पर्याय, मुंबईत तयार होणार आता 'प्लॅस्टिक'चे रस्ते

खड्ड्यांच्या रस्त्यांना नवा पर्याय, मुंबईत तयार होणार आता 'प्लॅस्टिक'चे रस्ते

महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त करणं हा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनेही प्लास्टिकविरोधातल्या मोहिमेला वेग दिलाय.

  • Share this:

मुंबई 22 जानेवारी: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या दालनात अनेक बदल केले. त्याच बदलात आता आणखी एका बदलाचा समावेश झाला आहे. मुंबईच्या महापौरांनी त्यांच्या दालनातील प्लास्टिकच्या सर्व वस्तू काढून टाकल्या आहेत. इतकंच नाही तर पाण्याच्या बाटल्याही प्लास्टिक ऐवजी काचेच्या आणण्यात आल्या आहे. ज्या बाटल्यांवर प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला आहे. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसां पूर्वी त्यांच्या दालनात हा बदल करून घेतला आहे हेच बघून मुंबईच्या महापौरांनी त्या राहत असलेल्या जी साऊथ या पालिका कार्यालयात,भायखळा येथील महापौर निवासात आणि मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील त्यांच्या दालनात या काचेच्या बाटल्यांचा समावेश करून घेतला आहे. एवढच नाही तर प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून आता मुंबईचे रस्ते तयार करण्याचा नवा प्रयोगही होणार असून महापौरांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय.

चांगल्या कामाची सुरुवात स्वतः पासून करावी या उद्देशाने या कामाची सुरुवात केली असल्याचं महापौरांनी सांगितलं आहे. सोबतच महापालिकेतील इतर कार्यालय आणि विभाग कार्यालय येथेही ही योजना सक्तीची किंवा ऐच्छिक करण्या बाबत चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती महापौरांनी दिली आहे. या बाटल्यांवर मुंबई महापालिकेचे नाव असून प्लास्टिक मुक्तीचा संदेशही लिहिण्यात आला आहे.

रस्त्याच्या टेंडरवरून शिवसेनेच्या आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

सध्या मुंबई महापालिका ही प्लास्टिक मुक्ती वर भर देत आहे त्यातूनच रोज नवनव्या योजना आणि क्लुप्त्या बाहेर पडत आहेत प्लास्टिकचे रस्ते तयार करण्याचा प्रस्तावही त्यापैकीच एक आहे मुंबई प्लास्टिक मुळे खूप मोठ्या प्रमाणावर कचरा होत असून नदी-नाले यांचे प्रवाह थांबण्याचे प्रकार घडले आहेत त्यामुळेच प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे परंतु या नंतरही अनेक ठिकाणी प्लास्टिकचा वापर सर्रास होताना दिसतोय.

आदित्य ठाकरे ठाकरे न्याय द्या, नाही तर जलसमाधी घेणार; रिव्हर राफ्टींग बंद

प्लास्टिकविरोधी अभियानांतर्गत महापालिकेच्या कारवाईमध्ये ही बरच प्लास्टिक गोळा झालंय.आता प्लास्टिकचा वापर रस्ते बनवण्यासाठी केला जाणार आहे प्लास्टिक आणि यांना एकत्रित करून नवे रस्ते तयार केले जाणार आहेत. मुंबई महापालिकेनं आजवर अनेक प्रयोग करून पाहिले आहेत तरीही रस्त्यांना पडणाऱ्या खड्ड्यांच्या पासून पालिकेची सुटका झालेली नाही म्हणूनच हे प्लास्टिकचे रस्ते तयार करून बघण्याचा प्रयोग केला जाणार आहे.

 

 

First published: January 22, 2020, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading