खड्डे न बुजवणाऱ्या लालबागच्या राजा मंडळाला 4.78 लाखांचा दंड

खड्डे न बुजवल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं मंडळाला तब्बल 4.78 लाखांचा दंड ठोठावलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2017 10:31 PM IST

खड्डे न बुजवणाऱ्या लालबागच्या राजा मंडळाला 4.78 लाखांचा दंड

13 सप्टेंबर : मुंबईतल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मुंबई महापालिकेनं चांगलाच दणका दिलाय. खड्डे न बुजवल्याप्रकरणी मंडळाला तब्बल 4.78 लाखांचा दंड ठोठावलाय.

गणेशोत्सवा दरम्यान लालबागच्या राजा मंडळाने ठिकठिकाणी खड्डे खोदले होते. पण खोदलेले केलेले खड्डे न बुजवल्या प्रकरणी पालिकेनं मंडळाला ४.८७ लाख रूपयांचा दंड ठोठावलाय.

मुंबई महापालिका रस्त्यावर करण्यात येणाऱ्या खड्यांसाठी सर्वच गणेशोत्सव मंडळाला अशा प्रकारचा दंड ठोठावते. पण मंडळानं २४७ खड्डे न भरल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आलाय. इतर मंडळाच्या तुलनेत लालबाग मंडळाने केलेले खड्डे जास्त आहेत. यापूर्वी ही अनेकदा मंडळाकडून दंड वसूल करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2017 10:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...