मुंबईला तिप्पट किमतीत Oxygen, प्लांटची निविदा इतर मनपांच्या तुलनेत फार जास्त असल्याचा भाजपचा आरोप

मुंबईला तिप्पट किमतीत Oxygen, प्लांटची निविदा इतर मनपांच्या तुलनेत फार जास्त असल्याचा भाजपचा आरोप

BMC oxygen plant tender process प्लांटच्या किमतींबरोबरच इतरही आरोप करण्यात आले आहेत. काळ्या यादीत टाकलेल्या आणि ऑक्सिजन निर्मितीचा अनुभव नसलेल्या कंपन्या निविदा भरत आहेत. त्यामुळं या निविदा जनतेला नव्हे तर वेगळ्याच लोकांना फायदा देण्यासाठी काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 मे : मुंबई महापालिकेकडून (BMC) ऑक्सिजन प्लांटसाठी (Oxygen Plant) काढण्यात आलेल्या निविदेत भ्रष्टाचार (Tender Process) होत असल्याचा आरोप आरोप भाजपच्या (BJP) वतीनं करण्यात आला आहे. ऑक्सिजनचे (Oxygen) याच क्षमतेचे प्लांट मीरा भाईंदर, कल्याण, वसई विरार या महापालिकांना कमी किमतीत मिळाले. पण मुंबई महापालिका त्यासाठी तिप्पट पैसे का मोजत आहे? असा सवाल उपस्थित करत भाजपनं काही लोकांना फायदा मिळण्यासाठी हा भ्रष्टाचार (corruption) असल्याचा आरोप केला आहे.

(वाचा - Maratha Reservation: लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार - मुख्यमंत्री)

प्लांटच्या किमतींबरोबरच इतरही आरोप करण्यात आले आहेत. काळ्या यादीत टाकलेल्या आणि ऑक्सिजन निर्मितीचा अनुभव नसलेल्या कंपन्या निविदा भरत आहेत. त्यामुळं या निविदा जनतेला नव्हे तर वेगळ्याच लोकांना फायदा देण्यासाठी काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. मुंबईला ऑक्सिजन हा पुरेसा आणि तातडीने मिळालाच पाहिजे. पण त्यासाठी भ्रष्टाचार होता कामा नये. जनतेच्या पैशांची लूट मुंबई मनपाने करू नये, तसं झाल्यास मोठं आंदोलन उभारावे लागेल अशी भूमिका भाजपचे गटनेते विनोद मिश्रा यांनी व्यक्त केली आहे.

(वाचा -ईडीकडून कारवायाऐवजी देशातील ऑक्सिजनच्या स्थितीकडे लक्ष द्या,रोहित पवारांचा टोला)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सर्व स्तरावर उपाययोजना करत आहे. त्यासाठी शहर आणि उपनगरांत ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. पण निविदा प्रक्रिया पारदर्शी नसून अशाच प्रकल्पासाठी वसई-विरार महानगरपालिकेनं काढलेल्या निविदेपेक्षा बृहन्मुंबई महापालिका अधिक खर्च करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याची सखोल चौकशी मनपा आयुक्तांनी करावी अशी मागणी विनोद मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत केली.

ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी सर्व पातळ्यांवर स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न होत आहे. त्याचाच भाग म्हणून वसई-विरार महानगरपालिकेनेही निविदा काढल्या आहेत. यातील टेक्नोमेट निविदाकाराचे दर मुंबई महानगरपालिका प्रशासनातील निविदा प्रक्रियेतील दरांच्या तुलनेत कमी आहे. त्याच ऑक्सिजन प्लांट उभारणी प्रकल्पासाठी मुंबई मनपा प्रशासन दुप्पट अधिक खर्च करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ऑक्सिजन निर्मिती तातडीनं करणं गरजेचं आहे. त्यामुळं यावर तातडीनं चौकशी व कार्यवाही करावी. तसचे योग्य दरात ऑक्सिजन पुरवठा मुंबईकरांना मिळावा असं प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे.

Published by: sachin Salve
First published: May 11, 2021, 6:12 PM IST

ताज्या बातम्या