कमला मिलच्या आगीनंतर आली बीएमसीला 'जाग'; हॉटेल पाहणीचे बीएमसीचे आदेश

या सर्व हॉटेल्समध्ये बार आणि पब्सचाही समावेश आहे. यासाठी २४ टीम्स बनवण्यात आल्या आहेत. परीक्षेत्रीय पालिका उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांचा या टीम्समध्ये समावेश आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 30, 2017 09:27 AM IST

कमला मिलच्या आगीनंतर आली बीएमसीला 'जाग'; हॉटेल पाहणीचे बीएमसीचे आदेश

30 डिसेंबर:  मुंबईतल्या कमला मिलमध्ये लागलेल्या आगीनंतर मुंबई महापालिकेला पुन्हा एकदा जाग आलीये. मुंबईतल्या सर्व हॉटोल्सची पाहणी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहतांनी दिले आहेत.

या सर्व हॉटेल्समध्ये बार आणि पब्सचाही समावेश आहे. यासाठी २४ टीम्स बनवण्यात आल्या आहेत. परीक्षेत्रीय पालिका उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांचा या टीम्समध्ये समावेश आहे. हॉटेल्सनं अग्निशमन संबंधी सर्व नियम पाळलेत का, आपात्कालीन दरवाजे आहेत का, आणि हॉटेलच्या बाहेर अतिक्रमणं नाहीयेत ना, याची खात्री या पाहणीत केली जाणार आहे. पुढच्या १५ दिवसांत पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

तर दुसरीकडे कमला मिलमधल्या आगीनंतर सर्वच राजकीय  पक्षांनाही जाग आली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल कमला मिलमधले काही पब्स जबरदस्तीनं बंद करायला लावले. लोअर परळमधल्या इतर भागातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची दादागिरी सुरू होती. हॉटेल्सवर कारवाई झाली पाहिजे, यात वाद नाही.  पण राजकीय पक्षांनी कायदा हातात घेणं योग्य नाही. ते काम पोलीस आणि पालिकेचंच आहे.

कमला मिल प्रकरणानंतर आता वातावरण चांगलंच तापत चाललं आहे. त्यामुळे आता महापालिका काय पाऊलं उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2017 09:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...