मनसेच्या टीकेवर आता शिवसेनेचा पटलटवार, महापौरांकडून उत्तर

मनसेच्या टीकेवर आता शिवसेनेचा पटलटवार, महापौरांकडून उत्तर

मनसेनं शिवसेनेवर टीका करत महापौर महाडेश्वर यांना जाड भिंगाचा चष्मा पाठवला.

  • Share this:

मुंबई, 6 जुलै : 'मुंबईत कुठंही पाणी तुंबलं नाही,' असा दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. त्यानंतर मनसेनं शिवसेनेवर टीका करत महापौर महाडेश्वर यांना जाड भिंगाचा चष्मा पाठवला होता. मनसेच्या या टीकेवर आता विश्वनाथ महाडेश्वर यांनी मनसेला प्रत्युत्तर दिलं आहे.

'जाड भिंगाच्या चष्माची गरज मला नसून मनसेला आहे. मला अजून चांगली दृष्टी आहे. चष्म्याची भेट देणारे किती वेळा पाण्यात उतरून लोकांसाठी काम करत होते?' असा सवाल करत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मनसेला सडेतोड उत्तर दिलं आहे.

काय होती मनसेची भूमिका?

'ज्यांना मुंबईची दयनिय परिस्थिती दिसत नाही अशा नेत्यांना मनसेकडून मोफत चष्मा देऊ,' अशी भूमिका घेत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महापौरांना कुरिअरने जाड भिंगाचा चष्मा भेट म्हणून पाठवला. तसंच इतरही कोणत्या नेत्याला मुंबईची अवस्था दिसत नसेल तर त्यांनाही असाच चष्मा पाठवू, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं.

काही दिवसांपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसानंतर मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं. या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. मुंबईची तुंबई झाल्यानंतर महपौरांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र महापौरांनी मुंबईत पाणी तुंबलंच नाही, असा दावा केला होता.

दरम्यान, काहीशा विश्रांतीनंतर मुंबईमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांतही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. काल पावसानं थोडी उसंत घेतली होती. पण, सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मुसळधार पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

ठाणे, डेंबिवलीतही पावसानं हजेरी लावली आहे. दिवा, कल्याण आणि ग्रामीण भागात रात्रीपासूनच पाऊस पडत असूनच मध्येच जोरदार पाऊस तर मध्येच हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे आज दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरात अधून मधून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुलीच्या डोळ्यातून चक्क निघतात खडे; काय आहे या VIDEOमागचं सत्य?

First published: July 6, 2019, 11:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading