मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai: "करण जोहरच्या पार्टीत कोण मंत्री होता हे आशिष शेलारांनी सिद्ध करावं अन्यथा माफी मागा" - किशोरी पेडणेकर

Mumbai: "करण जोहरच्या पार्टीत कोण मंत्री होता हे आशिष शेलारांनी सिद्ध करावं अन्यथा माफी मागा" - किशोरी पेडणेकर

महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या, "करण जोहरच्या पार्टीत कोण मंत्री होता हे शेलारांनी सिद्ध करावं अन्यथा..."

महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या, "करण जोहरच्या पार्टीत कोण मंत्री होता हे शेलारांनी सिद्ध करावं अन्यथा..."

BMC Mayor Kishori Pednekar on Ashish Shelar allegation: भाजपचे नेते आशिष शेलार यांनी 16 डिसेंबर रोजी एक पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यावर निशाणा साधला होता. तसेच मुंबई मनपाच्या कार्यावरही प्रश्न उपस्थित केले होते.

पुढे वाचा ...

मुंबई, 20 डिसेंबर : भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी चार दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि मुंबई मनपावर (BMC) आरोप केले होते. बॉलिवूड सिने निर्माता, दिग्दर्शक करण जोहर (Karan Johor) याने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या सेलिब्रेटींपैकी काहींना कोरोनाचा संसर्ग (Covid19) झाल्याचं समोर आलं. करण जोहोरच्या पार्टीत राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित होता का? असा सवालही उपस्थित केला होता. यावर आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी भाष्य केलं आहे.

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, कोरोनाच्या संकटाला सामोरं जावं लागत असताना मनपा, राज्य सरकार, केंद्र सरकार, स्वत: पंतप्रधान या संदर्भात कायम सतर्क करत असतात. माझा आशिष शेलार यांना सवाल आहे, तुम्ही म्हणाला होता ना की कुणीतरी मंत्री महोदय पार्टीत उपस्थित होते. आता ते सिद्ध करा. दाखववा कोण उपस्थित होते. कारण बेछूट आरोप करायचं, बेछूट आरोप करुन सतत नागरिकांत संभ्रम करायचा. आता मुंबईच्या जनतेला कळलं आहे, तुमच्या कामाची पद्धत कळली.

वाचा : संजय राऊतांचे अमित शहांना सवाल, म्हणाले 'पुण्यात जमत नसेल तर दिल्लीत उत्तर द्या'

पुराव्यानिशी सिद्ध करा नाहीतर...

आशिष शेलारांना सांगायचंय की, तुम्ही आमदार झालेत, मंत्री महोदय सुद्धा झाले पण जीव अद्याप महानगरपालिकेत घुसमटतोय. उगाच आरोप करु नका. लोकशाहीने अधिकार दिलाय म्हणून काहीही आरोप करु नका. लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा अपमान करु नका. तुमच्याकडे पुरावे आहेत तर दाखवा आणि सिद्ध करा. कोणतरी कोण होते हे पुराव्यानिशी सिद्ध करा नाहीतर मुंबईकरांची माफी मागावी असंही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

तुमचे स्थायी समितीत 83 नगरसेवक आहेत ते काय अकार्यक्षम आहेत? आणि तुम्ही एकटे हुशार आहात का? घोटाळे घोटाळे म्हणून स्वत:चे घोटाळे लपवत राहायचे. तुमचे नगरसेवक तुमच्या कार्यपद्धतीला कंटाळले आहेत. अनेक नगरसेवक संपर्कात आहेत असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

वाचा : मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज देणाऱ्या अमित शहांना राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

पार्टीत राज्य सरकारमधील मंत्री होता? शेलारांचा रोख कुणाकडे?

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं, करण जोहर यांच्या घरी पार्टी झाली आणि या पार्टीत असलेल्यांपैकी तिघांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या मी वाचल्या. त्या बातम्या वाचून मी बोलतो, त्या पार्टीत आठच लोकं होतं की आणखी माणसं होतं. त्याबाबत सीसीटीव्ही फूटेज किंवा त्या ठिकाणी उपस्थित असलेले ड्रायव्हर आणि इतर उपस्थित असलेल्यांकडून माहिती गोळा केल्याचं दिसत नाहीये. आमचा सवाल मनपाला आहे की, त्या पार्टीत राज्य सरकारमधील कोणी मंत्री होता का?

First published:

Tags: BMC, Bollywood, Kishori pedanekar, Mumbai