Home /News /mumbai /

मुंबईच्या महापौरांना धमकी, शरद पवार म्हणातात "बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, प्रतिक्रिया दिली तर तर कुणी नादाला लागणार नाही"

मुंबईच्या महापौरांना धमकी, शरद पवार म्हणातात "बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, प्रतिक्रिया दिली तर तर कुणी नादाला लागणार नाही"

मुंबईच्या महापौरांना धमकी, शरद पवार म्हणाले, ".... तर कुणी नादाला लागणार नाही"

मुंबईच्या महापौरांना धमकी, शरद पवार म्हणाले, ".... तर कुणी नादाला लागणार नाही"

Sharad Pawar reaction on bmc mayor received letter of death threat: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना एक धमकीचं पत्र आलं आहे. या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलिसांतही तक्रार दाखल केली आहे.

    विशाल पाटील, प्रतिनिधी मुंबई, 11 डिसेंबर : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांना धमकीचं पत्र आल्याने एकच खळबळ उडाली. या पत्रात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (NCP Chief Sharad Pawar reaction on BMC Mayor Kishori Pednekar gets letter of death threat) ... तर कुणी नादाला लागणार नाही सामाजिक कार्यात काम करत असताना महिलांना धमक्या दिल्या जात आहेत. अश्लिल भाषेचा वापर केला जातो याबाबत तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नावर शरद पवारांनी म्हटलं, अशी उदाहरणे ऐकायला मिळतात. ज्यांना याच्या यातना भोगाव्या लागतात त्यांनी बघ्याची भूमिका घेऊ नये. त्याच्या संदर्भात आपली भूमिका तातडीने घ्यायला हवी. आता नुकतेच मुंबईच्या महापौरांना कुणीतरी अश्लिल भाषेत पत्र लिहून धमकी दिली. त्यानंतर मुंबईच्या महापौरांनी तात्काळ या संदर्भात तक्रार दाखल केली आणि आपलं म्हणणं मांडलं. यानंतर महापौरांना यातना देणाऱ्यांच्या विरोधात जनमाणसातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. तर इतरजण याबाबत खुलासा करत आहेत की आम्ही यात नाहीत. असे प्रकार होतात, ते प्रकार झाल्यावर बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, त्यावर रिअॅक्ट व्हाव लागेल. सर्व मुलींनी एकत्र येऊन रिअॅक्ट करण्याची भूमिका घेतली तर कुणी नादाला लागणार नाही. वाचा : "दादाकडे बघशील तर...", मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी शरद पवारांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या निवडक भाषणांवर 'नेमकचि बोलणे' पुस्तक काढण्यात आलं आहे. या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये पार पडले. यावेळी शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. वाचा : महापौर किशोरी पेडणेकरांना अश्लिल भाषेत पत्र लिहिणारा निघाला वकील महापौरांना आलेल्या धमकी पत्रात काय म्हटलंय? मिळालेल्या माहितीनुसार, या पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालुन मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे सांगत अश्लिल भाषेत धमकी देणारे हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आले आहे. महापौर झाल्यापासून दुसऱ्यांदा धमकी गेल्यावर्षीही महापौर किशोरी पेडणेकर यांना फोनद्वारे धमकी आली होती. त्यावेळी सुद्धा धमकावणाऱ्याने किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुसऱ्यांदा धमकी आली आहे. वाचा : महापौर पेडणेकरांना धमकी पत्राची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, पोलिसांना दिले थेट आदेश किशोरी पेडणेकरांना अश्लिल भाषेत पत्र किशोरी पेडणेकर यांनी या पत्राबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. धमकी पत्र सकाळी मला मिळालं. गेली 40 वर्ष राजकारणात असून चारित्र्य जपलं. आज सकाळी एक पत्र मिळालं. या पत्राची भाषा अत्यंत लज्जास्पद आहे. मारून टाकु विटंबना करू, मुलगा आणि नवऱ्याला मारून टाकु तुमच्या अवयवांची विटंबना करू अशी भाषा वापरली, हे अत्यंत किळसवाने होते, असं सांगताना महापौर किशोरी पेडणेकर भावनिक झाल्या. महिलांचा मान आपण राखतो पण आता राजकीय टीका स्तर खालावत चालला आहे. वापरलेले शब्द मला क्लेशकारक आहे विजेंद्र म्हात्रे या नावाच्या व्यक्तीने हे पत्र लिहिलं आहे. हे पत्र उरणमधून पाठवलंय. पोस्टल पनवेलच आहे विजेंद्र म्हात्रे याने हे पत्र लिहिलं असून तो अॅडव्होकेट आहे असे लिहिले आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Kishori pedanekar, Mumbai, NCP

    पुढील बातम्या