S M L

बीएमसीच्या आशीर्वादानं फेरीवाले बसणार राज ठाकरेंच्या दारात, मातोश्रीबाहेर नो हाॅकर्स झोन

फेरीवाल्याच्या धोरणाची आखणी करणाऱ्या बीएमसीने राज ठाकरेंच्या घराच्या समोरचा आणि मागच्या अशा दोन्ही रस्त्यांवर २० फेरीवाल्यासाठी पट्टे आखले आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Jan 16, 2018 03:30 PM IST

बीएमसीच्या आशीर्वादानं फेरीवाले बसणार राज ठाकरेंच्या दारात, मातोश्रीबाहेर नो हाॅकर्स झोन

16 जानेवारी :  फेरीवाल्याच्या धोरणाची आखणी करणाऱ्या बीएमसीने  राज ठाकरेंच्या घराच्या समोरचा आणि मागच्या अशा दोन्ही रस्त्यांवर २० फेरीवाल्यासाठी पट्टे आखले आहेत. एम. बी राऊत मार्ग आणि केळुसकर मार्ग अशी या दोन रस्त्यांची नावं असून सध्या या दोन्ही रस्त्यावर एकही फेरीवाला बसत नाही.

राज ठाकरेंनी एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांविरोधात  मोहीम सुरू केली होती. त्याचा परिणाम म्हणून मनसे नेत्यांवर फेरीवाल्यांनी हल्लेही केले. संजय निरुपम यांनी तर फेरीवाल्यांची बाजू घेत मनसे विरोधात दंड थोपटले होते. नाना पाटेकरांशीही राज ठाकरेंनी याविषयावर पंगा घेतला होता.

आता महानगरपालिकेनंच राज ठाकरेंची खोडी काढल्याचं म्हटलं जातंय. मनसेकडून बीएमसीचा विरोध करण्यात आलाय.आश्चर्य म्हणजे उद्धव ठाकरेंच्या घराच्या समोरचा आणि मागचा असे दोन्ही रस्ते फेरीवाल्याच्या बसण्याच्या जागेतून वगळण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2018 03:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close