S M L

मध्यान्ह भोजन देणाऱ्या संस्थेला 500 कोटींचा भूखंड फुकटात !

मुंबईतल्या वाकोला परिसरातला ३ हजार स्वेअर मीटरचा भूखंड माध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या एका संस्थेला फुकटात वापरण्यासाठी देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय.

Sonali Deshpande | Updated On: Jul 12, 2017 01:09 PM IST

मध्यान्ह भोजन देणाऱ्या संस्थेला 500 कोटींचा भूखंड फुकटात !

प्रणाली कापसे, 12 जुलै : मुंबईतल्या जमिनी या खैरातीमध्ये वाटण्याचा प्रकार मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा दिसून येतोय. मुंबईतल्या वाकोला परिसरातला ३ हजार स्वेअर मीटरचा भूखंड माध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या एका संस्थेला फुकटात वापरण्यासाठी देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय. हा भूखंड हयात हॉटेल गेली अनेक वर्षे पालिकेला हस्तांतरीत करीत नव्हतं. दोन महिन्यापुर्वीच भूखंड पालिकेला मिळाला आणि तो लगेच एका खाजगी संस्थेला कोणतंही टेंडर न काढता दिला गेला.

मुंबईतल्या हयात हॉटेलला लागून असलेला हा ३ हजार स्वेअर मीटरचा ५०० कोटीहून अधिकचा भूखंड बीएमसीनं फुकटात देण्याचा निर्णय घेतलाय. अक्षय पात्रा फाऊंडेशनला, बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरवठा करण्यासाठी सेंट्रल किचन बनवण्यासाठी हा प्लाॅट देण्याचं गटनेत्यांनी तत्त्वता ठरवलंय. मुख्य म्हणजे बीएमसी शाळेत शिकणाऱ्या सव्वा तीन लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त पाच हजार विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन फुकटात देण्याच्या नावावर हे केलं जातंय. ज्याला काँग्रेसनं विरोध केलाय.

हा भूखंड बीएमसीला हयातचा विकास झाल्यानंतर मिळाला आहे. मुंबईतल्या पुर्नविकासात मिळालेल्या मोठ्या भूखंडांमध्ये हा एक मोठा भूखंड आहे. त्यात हा भूखंड मिळवण्यासाठी बीएमसीनं कुठलेही कष्ट घेतले नाहीत. काँग्रेसचे माजी नगरसेवक ब्रायन मिरांडा यांच्या प्रयत्नाने हा भूखंड बीएमसीला वर्ग झालाय. आणि आता या निर्णयाच्या विरोधात त्यांनी कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतलाय.

मुंबईत ज्या जागेचं भाडं सुद्धा कोट्यवधी रुपये येऊ शकतं त्या जागेला शिवसेनेनं ५ हजार मुलांच्या मध्यान्ह भोजनासाठी एखाद्या संस्थेला फुकटात देऊन टाकणं कुठल्याही सुज्ञ माणसाला खटकण्यासारखं आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त अजय मेहता यावर आता काय अभिप्राय देतात हे पहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2017 11:25 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close