News18 Lokmat

'बीएमसी' मुंबईतील मोकळ्या जागा परत घेणार

मुंबईतील 43 प्लॉट्स अद्यापही पावर फुल राजकारण्यांच्या संस्थाकडे आहेत. त्यामध्ये शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या संस्थांचा भरणा अधिक आहे. या सर्वांना आता बीएमसीच्या मोकळ्या जागा परत कराव्या लागणार आहेत

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2017 11:53 AM IST

'बीएमसी' मुंबईतील मोकळ्या जागा परत घेणार

मुंबई, 28 जुलै : मुंबईतल्या महापालिकेच्या मोकळ्या जागा परत घेण्याची मोहीम पुन्हा सुरू झालीय, राज्य सरकारच्या आदेशानंतर बीएमसीने गेल्या वर्षी 173 मोकळ्या जागा ज्या संस्था आणि संघटनांना देखभालीसाठी दिल्या होत्या त्या परत घेतल्या, खरे तर मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावामुळे सरकारला महापालिकेला तसे आदेश देणे भाग पडले, 43 प्लॉट्स अद्यापही पावर फुल राजकारण्यांच्या संस्थाकडे आहेत. त्यामध्ये सरकार आणि बीएमसीमध्ये सत्तेमध्ये असलेल्या शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या संस्थांचा भरणा अधिक आहे. त्यांनी गेल्या वर्षीच्या मोहिमेला जुमानले नाही. पण सामाजिक कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्यावर मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना या जागाही परत घेण्याचे आदेश दिले आहेत.

पुढच्या आठवड्यात ही प्रक्रिया सुरु होईल, तत्पूर्वी आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित नेत्यांची बैठक घेऊन सर्व सहमती करण्याचा प्रयत्न केला, बीएमसीच्या मोकळ्या जागा घेऊन त्यावर महागडे क्लब तसेच पक्षीय आणि संस्थाची कार्यालये तसेच अनेक ठिकाणी त्या जागांचा व्यावसायिक वापर सुद्धा सुरु आहे. मुंबई आणि उपनगरात 216 असे प्लॉट्स आहेत. बीएमसीला परत केलेल्या 173 प्लॉट्सपैकी अद्याप कितीतरी प्लॉट्स जुन्या संस्था अजूनही वापरत आहेत. फक्त बीएमसीने तांत्रिकदृष्ट्या म्हणजेच फक्त कागदोपत्री ते प्लॉट परत घेतले आहेत. या सर्व प्लॉट्सचा कसा वापर केला आणि त्यातून किती नफेखोरी झाली याची चौकशीची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे या प्लॉट्सबाबत नवे धोरण आखण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. त्यामुळे बीएमसीच्या बड्या राजकीय धेंडांना या मोकळ्या जागा सोडाव्या लागणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2017 11:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...