मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'प्रत्येक वॉर्डात जाऊन ठाकरेंची..' मुंबईत मिशन 150 साठी भाजपचा मेगा प्लान तयार; कशी आहे योजना?

'प्रत्येक वॉर्डात जाऊन ठाकरेंची..' मुंबईत मिशन 150 साठी भाजपचा मेगा प्लान तयार; कशी आहे योजना?

मुंबईत मिशन 150 साठी भाजपचा मेगा प्लॅन तयार

मुंबईत मिशन 150 साठी भाजपचा मेगा प्लॅन तयार

BMC Elections : पुढील काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी शिवसेना, भाजपसह इतर पक्षांनी तयारी सुरु केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मिशन 150 ची घोषणा भाजपकडून देण्यात आली आहे. हा संकल्प सत्यात उतरवण्यासाठी भाजपने मेगा प्लान तयार केला आहे. त्यानुसार मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात जाऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पोलखोल करणार असल्याची रणनिती भाजपने आखली आहे. पुढील काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबई भाजपची कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे मुंबईतील खासदार, आमदार, नगरसेवक आणि मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुंबई जिंकण्यासाठी भाजपानं मिशन 150 ठरवलं आहे.

कसा आहे भाजपचा मेगा प्लान?

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजने मिशन 150 चा नारा दिला आहे. यासाठी मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात जाऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पोलखोल करणार असल्याची रणनिती भाजपने आखली आहे. कोविड काळातील भ्रष्टाचार, पालिकेतला सत्ताधाऱ्यांचा कारभार भाजप चव्हाट्यावर आणणार आहे. या सोबत मुंबईकरांपर्यत शिंदे-फडणवीस सरकारची आणि केंद्र सरकारची चांगली कामे पोहोचवणार आहे. मुंबईतील भाजपच्या सर्व खासदार-आमदारांकडे मिशन 150 ची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. रोज 1500 लोकांपर्यत पोहोचण्याचे भाजपचे टार्गेट आहे.

वाचा - युतीत नॉट ओके, मुख्यमंत्री शिंदेंच्या खास मंत्र्याच्या मतदारसंघात भाजपकडून कडकडीत बंद

काय झालं बैठकीत?

ज्या विभागात भाजपची मोठ्या प्रमाणात ताकद नाही, त्याठिकाणी पक्ष संघटन आणखी मजबूत आणि विविध कार्यक्रम राबवण्यासाठी निर्णय झाले. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करण्याचा सूचना देण्यात आल्या. मुंबईतील मूलभूत सोयीसुविधा लोकांना मिळाल्यात का हे पहा आणि त्या आपल्या मार्फत पोहचवा. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात आपल्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर भर देण्याविषयी मार्गदर्शन झाले. जिथे भाजपचा नगरसेवक तिथे भाजप उमेदवार दिला जाईल, जिथे सेनेचा तिथे शिंदे गट किंवा आपला चांगला उमेदवार देऊ. इतर पक्षाचे नगरसेवक आहेत. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपला जोर लावा, त्या जागा आपण लढवू असे सांगण्यात आले. आगामी निवडणुकीत भाजपने जे लक्ष्य निश्चित केले आहे ते कसे साध्य केले जाईल याचे समीकरण विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी मांडले.

आगामी मुंबई महापालिका दृष्टीने पक्ष संघटन आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी मिशन 150 ही भाजपची दादर कार्यालयांत महत्वपूर्ण बैठक होती. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रदेश भाजपा कार्यकारणी बैठक झाली. या बैठकीत विनोद तावडे (राष्ट्रीय सरचिटणीस, भाजपा), चंद्रशेखर बावनकुळे (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र भाजपा), पूनम महाजन, आशिष शेलार यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि सूचना दिल्या. भाजपच्या मिशन 150 ला आजपासून सुरुवात झाल्याचं  बोललं जातेय.

First published:
top videos

    Tags: BMC, Mumbai